पैशाचा वाद; देशी कट्टा रोखला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 01:44 AM2017-10-18T01:44:08+5:302017-10-18T01:45:05+5:30

उधार दिलेले पैसे मागण्याच्या कारणावरून एका २४  वर्षीय युवकाने देशी कट्टा काढून राजू इंगोले नामक इसमास  जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे रिसोड नाका परिसरा त एकच खळबळ माजली. प्रसंगावधान राखून शहर पोलीस  घटनास्थळी पोहचल्यामुळे पुढील अनर्थ टळला. ही घटना १७  ऑक्टोबरला संध्याकाळी ९ वाजताचे सुमारास घडली. 

Money laundering; The country cut off! | पैशाचा वाद; देशी कट्टा रोखला!

पैशाचा वाद; देशी कट्टा रोखला!

googlenewsNext
ठळक मुद्देउधार दिलेले पैसे मागण्याच्या कारणावरून रोखला देशी कट्टा२४ वर्षीय युवकाचा अन्य इसमास जीवे मारण्याचा प्रयत्न 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : उधार दिलेले पैसे मागण्याच्या कारणावरून एका २४  वर्षीय युवकाने देशी कट्टा काढून राजू इंगोले नामक इसमास  जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे रिसोड नाका परिसरा त एकच खळबळ माजली. प्रसंगावधान राखून शहर पोलीस  घटनास्थळी पोहचल्यामुळे पुढील अनर्थ टळला. ही घटना १७  ऑक्टोबरला संध्याकाळी ९ वाजताचे सुमारास घडली. 
शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय पाटकर यांनी दिलेल्या  माहितीनुसार, जुना रिसोड नाका परिसरात राजू इंगोले व गजू  चौधरी या दोघांमध्ये पैसे मागण्याच्या कारणावरून वाद सुरू हो ता. यादरम्यान गणेश संजय पोहोकार (वय २४, रा. गोरक्षण  विहिर जवळ, वाशिम) या युवकाने राजू इंगोले याच्या पोटापाशी  देशी कट्टा धरून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतू  घटनास्थळी डी.बी. पथकाचे राजेश बायस्कर व इतर  कर्मचार्‍यांनी प्रसंगावधान राखून पोहोकार याच्या हातामधील  देशी कट्टा हिसकल्यामुळे पुढील अनर्थ टळला. 
या घटनेची वाशिम शहरात वार्‍यासारखी वार्ता पसरल्याने  घटनास्थळावर तोबा गर्दी जमली होती. गर्दीला पांगवण्यासाठी  पोलीसांना सौम्य लाठीमार करण्याचा देखील प्रसंग उद्भवला.  पोलीसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे इंगोले यांचे प्राण  वाचल्याचे प्रत्यक्षदश्रींनी सांगितले. 

Web Title: Money laundering; The country cut off!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा