वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडसह, व्यापाऱ्यांच्या मालाची उचल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 05:33 PM2018-06-05T17:33:40+5:302018-06-05T17:33:40+5:30

मंगळवारी बाजार समितीच्या शेडमध्ये असलेल्या नाफेडच्या मालासह व्यापाºयांचा मालही उचलण्याची प्रक्रिया बाजार समिती प्रशासकांच्या सुचनेनुसार करण्यात आली. 

Market Committee, merchants grains pick up | वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडसह, व्यापाऱ्यांच्या मालाची उचल 

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडसह, व्यापाऱ्यांच्या मालाची उचल 

Next
ठळक मुद्देव्यापाºयांनी खरेदी केलेला लाखो रुपयांचा शेतमाल उघड्यावर असल्याने सोयाबीनसह लाखो रुपयांचा इतर शेतमाल शनिवारी पावसात भिजला. शेडमध्ये पुरेशी जागा नसल्याने तो शेतमाल बाजार समितीच्या खुल्या जागेत उघड्यावर ठेवावा लागत होता.मंगळवार ५ जून रोजी बाजार समितीच्या शेडमधील नाफेड आणि व्यापाºयांचा शेतमाल उचलण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली.

वाशिम: तालुक्यात शनिवारी वादळी वाºयासह आलेल्या जोरदार पावसामुळे वाशिम बाजार समितीत विक्रीसाठी शेतकºयांनी आणलेला शेतमाल, तसेच व्यापाºयांनी खरेदी केलेला लाखो रुपयांचा शेतमाल उघड्यावर असल्याने सोयाबीनसह लाखो रुपयांचा इतर शेतमाल शनिवारी पावसात भिजला. लोकमतने याबाबत रविवार ५ जून रोजी ‘पावसात भिजला लाखो रुपयांचा शेतमाल !’ वृत्त प्रकाशित करून शेतकºयांची समस्या उजागर करताच मंगळवारी बाजार समितीच्या शेडमध्ये असलेल्या नाफेडच्या मालासह व्यापाºयांचा मालही उचलण्याची प्रक्रिया बाजार समिती प्रशासकांच्या सुचनेनुसार करण्यात आली. 
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाचा लिलाव करण्यासह तो विक्री होऊन उचल होईपर्यंत सुरक्षीत राहावा म्हणून ११ शेड उभारले आहेत. यापैकी ६ शेडमध्ये नाफेड मार्फत खरेदी केलेला शेतमाल ठेवला होता. खरिप हंगाम तोंडावर आल्याने बाजार समितीत शेतमालाची आवक वाढली असून, शेडमध्ये पुरेशी जागा नसल्याने तो शेतमाल बाजार समितीच्या खुल्या जागेत उघड्यावर ठेवावा लागत होता. वाशिम बाजार समितीत शनिवार ३ जून रोजीही हजारो क्विंटल शेतमाल विक्रीसाठी शेतकºयांनी आणला होता. या मालाचा लिलाव झाल्यानंतर मोजणी सुरू असतानाच अचानक वादळी वाºयासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाºयांना सावरायची संधीच मिळाली नाही आणि लाखो रुपयांचा शेतमाल पावसात पूर्णपणे भिजला. यावेळी खाली मोकळा ठेवलेला शेतमाल सावडण्यासह भरलेली पोती उचलण्यासाठी व्यापारी, शेतकरी आणि हमा मंडळीची चांगलीच तारांबळ उडाली होती. या संदर्भात लोकमतने रविवार ३ जून रोजी व्हिडिओसह वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर बाजार समितीच्या प्रशासकांनी नाफेडच्या खरेदीची जबाबदारी पार पाडणाºया संस्थेसह व्यापाºयांनाही त्यांचा शेडमधील माल उचलण्याच्या सुचना पत्राद्वारे केल्या. त्यानुसार मंगळवार ५ जून रोजी बाजार समितीच्या शेडमधील नाफेड आणि व्यापाºयांचा शेतमाल उचलण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली. त्यामुळे आता शेडमध्ये शेतकºयांचा शेतमाल ठेवण्यास जागा होऊन त्यांचे नुकसान टळणार आहे.

Web Title: Market Committee, merchants grains pick up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.