मालेगावात उन्हाच्या झळा तीव, रस्ते झाले निर्मनुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 02:40 PM2018-05-12T14:40:36+5:302018-05-12T14:40:36+5:30

मालेगाव : तालुक्यातील उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून, तापमाना ४२ अंशाच्यावर पोहोचल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, रस्तेही निर्मनुष्य झाले आहेत.

In Malagaon the sun shines, the streets are ruined | मालेगावात उन्हाच्या झळा तीव, रस्ते झाले निर्मनुष्य

मालेगावात उन्हाच्या झळा तीव, रस्ते झाले निर्मनुष्य

Next
ठळक मुद्दे नागरिक अत्यंत महत्त्वाचे काम करण्यासाठी घराबाहेर निघताना काळजी घेत आहेत. उष्माघातापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी शेले, टोप्यांचा वापर. दुपारी १२ वाजतापासून सायंकाळी ४.३० पर्यंत शहरातील रस्ते ओस पडत असल्याचे चित्र आहे.


 
मालेगाव : तालुक्यातील उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून, तापमाना ४२ अंशाच्यावर पोहोचल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, रस्तेही निर्मनुष्य झाले आहेत. या वातावरणाचा परिणात दिवसा चालणाºया विविध व्यवसायांवर होत असल्याचे दिसत आहे.  
उन्हाच्या लाटेमुळे जिवाची लाही लाही होत आहे. त्यामुुळे नागरिक अत्यंत महत्त्वाचे काम करण्यासाठी घराबाहेर निघताना काळजी घेत आहेत. उष्माघातापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी शेले, टोप्यांचा वापर होत असून, घशाला पडलेली कोरड मिटविण्यासाठी थंडपेयांचा आधार घेतला जात आहे. संपूर्ण मालेगाव तालुक्यात उष्णतेची लाट असून, दुपारी १२ वाजतापासून सायंकाळी ४.३० पर्यंत शहरातील रस्ते ओस पडत असल्याचे चित्र आहे. प्रत्येकजण सावलीचा आधार घेताना दिसतो. उन्हामुळे सावलीत बसूनही झळा सोसणे कठीण होत असून, यामुळे होणारा त्रास टाळण्यासाठी नागरिक गारवा असेल त्या ठिकाणीच उभे राहणे पसंत करीत आहेत. उन्हाच्या लाटेमुळे एव्हाना वर्षभर गजबजून राहत असलेली शासकीय कार्यालयेही ओस पडल्याचे दिसत आहे.  
उपाहारगृहे पडली ओस
वाढत्या तापमानामुळे  दुपट्टे व रुमाल गुंडाळून घराबाहेर पडावे लागत आहे. दुपारच्या वेळेत सहसा महत्त्वाचे काम वगळता इतर कामांसाठी बाहेर पडण्यास नागरिक तयार नाहीत. तालुक्यातील खेड्यांपाड्यांतूनही कामानिमित्त येणाºया ग्रामस्थांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी उपहारगृहेही ओस पडली असून, दिवसभर फरसान आणि फराळाचे इतर पदार्थ विकून गुजराण करणाºयांवर उपासमारीचीच पाळी आली आहे. चहाची मागणी घटून शीतपेयाची मागणी वाढली असली तरी, दुपारच्या वेळेत शीतपेयांच्या दुकानांतही नावापुरतेच ग्राहक पाहायला मिळत आहेत. सायंकाळी ५ वाजतानंतर मात्र आंब्याचा रस, उसाचा रस, ताक, लस्सी, निंबू सरबत घेण्यासाठी चौकात असलेल्या दुकानांमध्ये, हातगाड्यावंर लोकांची गर्दी दिसत आहे.

Web Title: In Malagaon the sun shines, the streets are ruined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.