रिसोड शहरातील मुख्य रस्ता टाकणार कात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 03:30 PM2019-07-01T15:30:07+5:302019-07-01T15:30:34+5:30

रस्ता नुतनीकरणासाठी अंदाजपत्रक तत्काळ सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १ जुलै रोजी दिले आहेत.

The main road in the city of Risod will re-constructed | रिसोड शहरातील मुख्य रस्ता टाकणार कात!

रिसोड शहरातील मुख्य रस्ता टाकणार कात!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : शहरातील कलूशा बाबा दर्गाह ते वाशिम नाका या ९४० मीटर लांबीच्या मुख्य रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. विशेषत: पावसाळ्यात या रस्त्यावर ठिकठिकाणी साचणाºया पाण्याच्या डबक्यांमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होतात. आता मात्र लवकरच हा रस्ता कात टाकणार असून बांधकाम विभागाने रस्ता नुतनीकरणासाठी अंदाजपत्रक तत्काळ सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १ जुलै रोजी दिले आहेत.
रिसोड शहरातील मुख्य बाजारपेठेतून जाणाºया रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झालेली आहे. ही बाब शिपिंग कॉपोर्रेशन आॅफ इंडियाचे संचालक तथा माजी आमदार अ‍ॅड. विजयराव जाधव यांनी रिसोड मतदारसंघाचे पालक आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निदर्शनास आणून दिली. दरम्यान, आमदार शर्मा यांनी १ जुलै २०१९ रोजी जाधव यांच्यासमवेत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली व रस्ता नुतनीकरणासाठी १० कोटी रुपयांची मागणी केली. ती मंत्र्यांनी मान्य करून रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करून सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सी.पी. जोशी यांना दिले.

Web Title: The main road in the city of Risod will re-constructed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.