मालेगांव तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेचे काम अंतिम टप्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 02:34 PM2018-04-13T14:34:59+5:302018-04-13T14:34:59+5:30

मालेगांव : तालुक्यातील सन २०११ चे आर्थीक  सर्वेक्षणावर आधारित प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल वाटप होणार आहे .

Last phase of the work of the Prime Minister's Housing Scheme in Malegaon taluka | मालेगांव तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेचे काम अंतिम टप्यात

मालेगांव तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेचे काम अंतिम टप्यात

Next
ठळक मुद्देतालुक्यात २२००० अर्ज मालेगांव पंचायत समितीला प्राप्त झाले होते .  लाभार्थाची निवड झाल्यानंतर  त्या लाभार्थाला १३८००० रुपये देन्यात येणार आहे . पक्के घर बांधकाम असल्यास लाभार्थी अपात्र ठरवण्यात येणार आहेत.

 
मालेगांव : तालुक्यातील सन २०११ चे आर्थीक  सर्वेक्षणावर आधारित प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल वाटप होणार आहे . त्याच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्यात आले असून कोणीही कोणत्याही दलालाशी आर्थिक व्यवहार करू नये .असे आवाहन मालेगाव पंचायत समितिचे गटविकास अधिकारी संदीप कोटकर यांनी केले आहे
                        सन २०११ ला आर्थिक सर्वेक्षण करण्यात आले होते . त्यानुसार त्याची  अंमलबजावनी  सन २०१६ ते २०१७  नुसार  सुरू असुन त्याचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे . त्यानुसार तालुक्यात २२००० अर्ज मालेगांव पंचायत समितीला प्राप्त झाले होते .  त्यानुसार गटविकास अधिकारी रविंद्र सोलव यांच्या मार्गदशनाखाली तालुक्यात १८ पथक तयार करण्यात आलेत .  प्रत्येक पथकामध्ये १ प्रमुख  व उपसहायक नेमल्या गेले होते . त्यांच्या सहाय्याने हे काम सुरू आहे . त्यानुसार लाभार्थाची निवड झाल्यानंतर  त्या लाभार्थाला १३८००० रुपये देन्यात येणार आहे . त्यांचे अपात्रता निकषनुसार  दुचाकी, तीन व चारचाकी वाहन असलेल्यास , शेती मशनरी असल्यास ,  किसान क्रेडीट कार्ड आहे व त्यांची मर्यादा ५०००० किवा त्यापेक्षा जादा असल्यास, शासकीय नोकरी असल्यास ,  नोंदणीकृत बिगरशेती व्यवसाय असल्यास , आयकरधारक असल्यास ,व्यवसाय कर भरणारे असल्यास   तसेच पक्के घर बांधकाम असल्यास लाभार्थी अपात्र ठरवण्यात येणार आहेत . यामध्ये अधिक काही अटी वगळता बाकी पात्र ठरवणार आहेत .मात्र काही लोक लाभार्थ्ययाशी संपर्क साधुन पैसे ची मागणी करीत आहेत .  तरीही कोणीही अर्थिक व्यवहार करू नये अशी माहिती मालेगाव पंचयात समितिचे गटविकास अधिकारी संदी कोटकर यांनी केले आहे.

 
अटी पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्याना या योजनेचा लाभ मिळणार आहे . मात्र आपला नंबर लागेल यासाठी लोक आर्थिक व्यवहार करतील म्हणून कोणीही कोणत्याही दलालाशी आर्थिक व्यवहार करू नये
         - संदीप कोटकर, गटविकास अधिकारी, पंचायत समिति मालेगाव
 
आपन २२ हजार घरांचे सर्वेक्षण केले असून सर्व माहिती  लाभर्थ्यांची नावे वरिष्ठ कार्यालयकडे पाठविणार आहे . तिकडून पुन्हा पाहणी झाल्या नंतर त्यांची नावे फाइनल होणार आहेत .
              - रविन्द्र सोलव, विस्तार अधिकारी मालेगाव

Web Title: Last phase of the work of the Prime Minister's Housing Scheme in Malegaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.