आरोग्य शिक्षण आणि स्वच्छतेत सर्वांचा पुढाकार महत्वाचा -  गजानन भोने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 01:35 PM2018-09-15T13:35:35+5:302018-09-15T13:36:05+5:30

आरोग्य शिक्षण आणि स्वच्छतेत सर्वांचा पुढाकार महत्वाचा आहे, असे प्रतिपादन वाशिम पंचायत समितीचे सभापती गजानन भोने यांनी केले.

Initiatives of health education and cleanliness are important | आरोग्य शिक्षण आणि स्वच्छतेत सर्वांचा पुढाकार महत्वाचा -  गजानन भोने 

आरोग्य शिक्षण आणि स्वच्छतेत सर्वांचा पुढाकार महत्वाचा -  गजानन भोने 

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  जिल्ह्यातील सर्व बालके सदृढ असली पाहिजेत. एकही बालक कुपोषणाच्या श्रेणीत नसावा. घर, परिसर स्वच्छ ठेवला तर गाव स्वच्छ होईल. स्वच्छता असेल तर आरोग्य चांगले राहील. आरोग्य शिक्षण आणि स्वच्छतेत सर्वांचा पुढाकार महत्वाचा आहे, असे प्रतिपादन वाशिम पंचायत समितीचे सभापती गजानन भोने यांनी केले.
जिजाऊ सभागृहात महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने तालुकास्तरीय पाककृती स्पर्धा आणि मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आहार शिजविणाºया महिलांसाठी आयोजित तालुका पोषण अभियान कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून  भोने बोलत होते.
प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा मानव विकास समितीचे सदस्य सुभाष चौधरी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले व सुदाम इस्कापे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, कुष्ठरोगचे सहाय्यक संचालक डॉ. दीपक सेलोकार, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, वाशिमचे सहाय्यक गटविकास अधिकारी निलेश वानखेडे, बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल चौधरी, युनिसेफचे प्रतिनिधी डॉ. महात्मे, गट शिक्षणाधिकारी गजानन बाजड यांची उपस्थिती होती.
यावेळी सुभाष चौधरी , मोहुर्ले ,इस्कापे ,डॉ. आहेर , डॉ. सेलोकार , खडसे , युनिसेफचे प्रतिनिधी डॉ. महात्मे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.प्रारंभी मान्यवरांनी राष्ट्रमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. यावेळी पोषण अभियानानिमित्त आयोजित पाककृती स्पर्धेचे उदघाटन पंचायत समिती सभापती गजानन भोने यांनी फीत कापून केले. सदृढ बालक स्पर्धेतील विजेत्या बालक व मातांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून सन्मानित करण्यात आले. शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत जाव्यात, यासाठी शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य या मासिकाचा स्टॉल देखील सभागृहाच्या प्रवेशद्वारा शेजारी लावण्यात आला होते. कार्यशाळेला विस्तार अधिकारी मदन नायक, केशवराव वाबडे, डॉ. डावरे, वाशिम पंचायत समिती अंतर्गत येणाºया केंद्र शाळांचे केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, मदतनीस व आहार शिजवणाº्या बचत गटांच्या महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Web Title: Initiatives of health education and cleanliness are important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम