चिमुकल्यांकडून दिला जातोय होळीच्या ‘चाकोल्यां’ना आकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 03:27 PM2018-02-26T15:27:21+5:302018-02-26T15:27:21+5:30

वाशिम : समाजातील प्रत्येक घटकास हवाहवासा वाटणारा रंगपंचमी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

Holi festival children make prepration | चिमुकल्यांकडून दिला जातोय होळीच्या ‘चाकोल्यां’ना आकार!

चिमुकल्यांकडून दिला जातोय होळीच्या ‘चाकोल्यां’ना आकार!

googlenewsNext
ठळक मुद्दे होळी-रंगपंचमीचा सण वाशिम जिल्ह्यात ठिकठिकाणी दरवर्षी हर्षोल्लासात साजरा केला जातो. शहरी भागात या सणाचे स्वरूप पालटले असले तरी ग्रामीण भागात मात्र जुन्या परंपरेनुसारच होळीचा सण साजरा केला जातो.शेणा-मातीच्या विविध आकारातील चाकोल्या, एरंड्याची झाडे, लाकूडाचा वापर करून होळी पेटविण्याची परंपरा असून त्याच्या तयारीत अबालवृद्ध लागले आहेत.


वाशिम : समाजातील प्रत्येक घटकास हवाहवासा वाटणारा रंगपंचमी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्याच्या एक दिवस आधी साजऱ्या  होणाऱ्या  होळीचीही सर्वांना आतुरता लागली असून, ग्रामीण भागात चिमुकल्यांकडून होळीत जाळल्या जाणाऱ्या  शेणा-मातीच्या ‘चाकोल्या’ तयार करण्याची लगबग सद्या सुरू असल्याचे दिसून येत आहे.
हिंदु संस्कृतिमधील महत्वाच्या सणांमध्ये स्थान असणाऱ्या  होळी-रंगपंचमीचा सण वाशिम जिल्ह्यात ठिकठिकाणी दरवर्षी हर्षोल्लासात साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये शहरी भागात या सणाचे स्वरूप पालटले असले तरी ग्रामीण भागात मात्र जुन्या परंपरेनुसारच होळीचा सण साजरा केला जातो. शेणा-मातीच्या विविध आकारातील चाकोल्या, एरंड्याची झाडे, लाकूडाचा वापर करून होळी पेटविण्याची परंपरा असून त्याच्या तयारीत अबालवृद्ध लागले आहेत. जिथे कुठे गुरांचे शेण मिळेल, तेथून ते आणायचे आणि त्यात थोडीफार माती मिसळवून सुंदर चाकोल्या तयार करायच्या. होळीपर्यंत त्या उन्हात सुकवून त्याची माळ तयार करण्याची तयारी सद्या सुरू असल्याचे दिसून येत आहे. या कामात विशेषत: ग्रामीण भागातील चिमुकली मुले आनंदाने गुंतली आहेत.

Web Title: Holi festival children make prepration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.