बोंडअळी नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 03:02 PM2018-12-18T15:02:59+5:302018-12-18T15:03:28+5:30

वाशिम: पुढील हंगामात बोंडअळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी सावरगाव जिरे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत येथे शेतकºयांसाठी शेती शाळा कार्यक्रम घेण्यात आला.

Guidance for farmers on the control of bollworms | बोंडअळी नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

बोंडअळी नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: पुढील हंगामात बोंडअळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी सावरगाव जिरे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत येथे शेतकºयांसाठी शेती शाळा कार्यक्रम घेण्यात आला. यात शेतकºयांना बोंडअळी नियंत्रणाबाबत कृषी अधिकाºयांनी मार्गदर्शन केले. 
 सावरगाव जिरे येथे आत्मा अंतर्गत आयोजित शेती शाळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच  दत्तात्रय नागुलकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय चौधरी उपस्थित होते. सदर कार्यक्रमास जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी दत्तात्रय साठे, मंडळ कृषी अधिकारी वाशिम १ सुभाष उलेमाले, तंटामुक्ती अध्यक्ष कैलास वानखेडे, उपसरपंच बबन साबळे. ग्रामपंचायत सदस्य संतोष वानखेडे, कैलास कोल्ह, उषा वानखेडे, ग्रामविकास अधिकारी माळेकर तसेच गावातील कापूस उत्पादक शेतकरी व महिला बचत गटाच्या शेतकरी महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमात पुढील हंगामात बोंडअळीचे प्रभावी नियंत्रण व्हावे म्हणून कापूस फरदड घेऊ नये, असे आवाहनही शेतकºयांना करण्यात आले. उपविभागीय कृषी अधिकारी चौधरी यांनी, शेतकºयांशी हितगुज करून त्यांचे प्रश्न जाणून घेतले, तसेच राज्यांतर्गत अभ्यास दौºयातील महिला गटांशी उपविभागीय कृषी अधिकाºयांनी चर्चा करून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश  लव्हाळे यांनी, सूत्रसंचालन   यशवंत अंभोरे यांनी, तर आभार प्रदर्शन कृषि सहाय्यक रविंद्र मापारी यांनी केले.

Web Title: Guidance for farmers on the control of bollworms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.