पडताळणीभोवतीच फिरतेय ‘ग्रीन लिस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 02:00 AM2017-11-15T02:00:09+5:302017-11-15T02:01:01+5:30

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्हय़ातील केवळ ५५ शेतकर्‍यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, पडताळणीभोवतीच ‘ग्रीन लिस्ट’चे (मंजूर यादी) घोडे अडले आहे.

'Green List' Goes Around Verification | पडताळणीभोवतीच फिरतेय ‘ग्रीन लिस्ट’

पडताळणीभोवतीच फिरतेय ‘ग्रीन लिस्ट’

Next
ठळक मुद्देकर्जमाफी योजना पहिल्या टप्प्यात केवळ ५५ शेतकर्‍यांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्हय़ातील केवळ ५५ शेतकर्‍यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, पडताळणीभोवतीच ‘ग्रीन लिस्ट’चे (मंजूर यादी) घोडे अडले आहे.
जून २0१७ मध्ये कर्जमाफीच्या मुद्यावरून विविध संघटना तसेच शेतकर्‍यांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने सुकाणू समिती व शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करीत कर्जमाफी जाहीर  केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयांची र्मयादा घालून कर्जमाफी योजनेची ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्हय़ातील एकूण २ लाख ६0 हजार शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केली असली तरी प्रत्यक्षात १ लाख २७ हजार शेतकर्‍यांनीच अंतिम मुदतीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरले. पात्र शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी तसेच यादी अचूक करण्याच्या दृष्टिकोनातून पहिल्या टप्प्यात गावस्तरावर चावडी वाचनही घेण्यात आले. चावडी वाचनातून अचूक ठरणार्‍या अर्जांची पडताळणी व किरकोळ दुरुस्त्या केल्यानंतर सदर यादी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली. शासनस्तरावरही या यादीला चाळणी लावण्यात आली. दिवाळीपूर्वी कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी प्रशासनातर्फे प्रातिनिधिक स्वरूपात ५0 शेतकर्‍यांची निवड केली होती. यापैकी ३३ शेतकर्‍यांना  कर्जमाफी प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानही केला होता. त्यानंतर पुन्हा यादीची पडताळणी केली असता, या ५0 पैकी काही शेतकरी अपात्र ठरले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ‘ग्रीन लिस्ट’ प्राप्त झाली. पडताळणीअंती ५५ शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. त्यानंतर ‘ग्रीन लिस्ट’ची पडताळणी सुरू आहे, या सबबीखाली अद्यापही शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. जिल्हा ते राज्यस्तरावर विविध चाळण्यातून कर्जमाफीचे प्रस्ताव गेल्यानंतर आणि परत चावडी वाचनातून पडताळणी केल्यानंतरही आता ‘ग्रीन लिस्ट’ची पडताळणीच सुरू असल्याने कर्जमाफीच्या लाभाबाबत शेतकर्‍यांमधून संभ्रम व्यक्त होत आहे. 
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ७९ हजार १३८ लाभार्थी असून, अचूक अर्ज असणार्‍या शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची पडताळणी यापूर्वीच करण्यात आली. ग्रीन लिस्टमधील शेतकर्‍यांच्या कागदपत्रे व बँक खात्यांची पुन्हा पडताळणी सुरूच आहे. ही पडताळणी कधी पूर्ण होणार, प्रत्यक्षात केव्हा लाभ मिळणार, ग्रीन लिस्टमध्ये किती शेतकर्‍यांचा समावेश आहे, याबाबत संबंधित यंत्रणा कमालीची गुप्तता पाळून असल्याचे दिसून येते. कर्जमुक्ती झाली नसल्याने थकबाकीदार शेतकर्‍यांना रब्बी हंगामात पीक कर्ज मिळू शकले नाही. 

Web Title: 'Green List' Goes Around Verification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.