ग्रामपंचायत निवडणूक वातावरण तापले

By Admin | Published: July 4, 2015 12:11 AM2015-07-04T00:11:55+5:302015-07-04T00:11:55+5:30

वाशिम जिल्ह्यातील एकूण ४९२ पैकी १६३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूका.

Gram Panchayat polling atmosphere washed out | ग्रामपंचायत निवडणूक वातावरण तापले

ग्रामपंचायत निवडणूक वातावरण तापले

googlenewsNext

वाशिम :ऑगष्ट-सप्टेंबर २0१५ मध्ये मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने २३ जुनला जाहीर केला असून त्या-त्या ग्रामपंचायत क्षेत्नात निवडणूक आचारसंहिताही २३ जुन मध्यरात्नीपासून लागू झाली असल्याने राजकारण्यांमध्ये एकच धावपळ सुरू झाली असून आतापासूनच प्रत्यक्ष भेटीवर भर दिल्या जात आहे. जिल्ह्यातील एकूण ४९२ पैकी १६३ ग्रामपंचायतींची सार्वत्निक निवडणूक होत असून या निवडणुकीला एक महिन्याचाच कालावधी राहील्याने राजकीय मंडळीने फिल्डींग लावणे सुरू केले आहे. ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वाशिम तालुक्यातील २३ गा्रमपंचायतींचा समावेश आहे. तसेच मालेगाव तालुक्यातील ३0, मंगरूळपीर तालुक्यातील २५, रिसोड तालुक्यातील ३४, कारंजा तालुक्यातील २८, मानोरा तालुक्यातील २३ ग्रामपंचायतचा समावेश आहे. १३ जुलैपासून निवडणुकीतील उमेदवारांचे नामनिर्देशनत्र दाखल करण्यास प्रारंभ होणार असल्याने गावागावात पारावर, ग्रामपंचायतमध्ये व गावातील नेत्यांच्या घरोघरी बैठका सुरु झाल्या आहेत. या बैठकींमध्ये रुसवे-फुगवे होत असल्याने नेत्यांची चांगलीच दमछाक होतांना दिसून येत आहे. जिल्हयातील नेते मंडळी आपल्या गटाला जास्तीत जास्त जागा कशा मिळविण्यात येतील यासाठी चांगल्या उमेदवारांचा शोध घेत आहेत. गावांमध्ये हवसे - नवसे बाशिंग बांधून तयार असल्याने आपल्यालाच तिकीट मिळणार नाही तर अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचे बोलत आहेत. एकंदरीत आतापासूनच वातावरण तापण्यास प्रारंभ झाला.

Web Title: Gram Panchayat polling atmosphere washed out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.