रिसोडमध्ये मंडपच्या गोदामाला भीषण आग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 05:35 PM2018-11-23T17:35:59+5:302018-11-23T17:36:44+5:30

रिसोड (वाशिम) : शहरातील रविदासनगर येथे लग्नमंडपाचे साहित्य ठेवून असलेल्या गोदामाला गुरूवार व शुक्रवारच्या रात्री २ वाजता भीषण आग लागली. यात सुमारे १८ लाख रुपयांची आर्थिक हानी झाली.

fire in the tents godown! | रिसोडमध्ये मंडपच्या गोदामाला भीषण आग!

रिसोडमध्ये मंडपच्या गोदामाला भीषण आग!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : शहरातील रविदासनगर येथे लग्नमंडपाचे साहित्य ठेवून असलेल्या गोदामाला गुरूवार व शुक्रवारच्या रात्री २ वाजता भीषण आग लागली. यात सुमारे १८ लाख रुपयांची आर्थिक हानी झाली.
यासंदर्भात लग्न मंडप व्यावसायिक अशोक बशिरे यांनी रिसोड पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की रिसोड शहरातील रविदास नगरस्थित त्यांच्या गोदामाला रात्री दोन वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. हा प्रकार लक्षात येताच बशिरे यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी पाण्याव्दारे आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत लग्न मंडपाचे साहित्य जळून खाक झाले होते. 
उपस्थितांपैकी काही लोकांनी यावेळी नगर परिषदेच्या अग्नीशमन दलाशी संपर्क साधला; परंतु सदर यंत्रणा तब्बल एक तास उशिराने घटनास्थळी दाखल झाली. तोपर्यंत अशोक बशिरे यांचे १८ लाख ३० हजार ५०० रुपयांचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले होते. याप्रकरणी रिसोड पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेत पुढील तपास हाती घेतला आहे.

Web Title: fire in the tents godown!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.