अखेर सातबारासाठीची ‘ओटीपी’ पद्धत बाद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 03:21 PM2019-03-13T15:21:07+5:302019-03-13T15:21:13+5:30

शेतकºयांची ही समस्या लक्षात घेऊन अखेर ‘ओटीपी’ची पद्धत बंद करण्यात आल्याने शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला.

Finally, the 'OTP' method for seven-bara cancelled | अखेर सातबारासाठीची ‘ओटीपी’ पद्धत बाद !

अखेर सातबारासाठीची ‘ओटीपी’ पद्धत बाद !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शासनाने शेतकऱ्यांना वेळेत आणि विनात्रास सातबारा मिळावा म्हणून या महत्त्वाच्या दस्तऐवजाचे संगणकीकरण केले आणि शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारा उपलब्ध केला; परंतु मागील आठवड्यात आॅनलाईन सातबारा काढण्यासाठी शेतकऱ्यांना मोबाईल क्रमांक टाकून ‘वन टाईम पासवर्ड’ (ओटीपी) अर्थात एकवेळचा सांकेतांक मिळवूनच सातबारा घ्यावा लागत होता. या प्रक्रियेमुळे मोबाईल नसलेल्या हजारो शेतकºयांची पंचाईत झाली होती. शेतकºयांची ही समस्या लक्षात घेऊन अखेर ‘ओटीपी’ची पद्धत बंद करण्यात आल्याने शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला.
शेतकºयांना विविध शासकीय योजना, कर्जप्रकरणे, खरेदीविक्री व्यवहारासह इतर कामकाजासाठी वारंवार सातबारा काढावा लागतो. हा सातबारा काढताना पूर्वीतलाठ्यांकडे वारंवार चकरा माराव्या लागत होत्या. त्यामुळे शासनाने सातबारांचे संगणकीकरण केले आणि त्यात आवश्यक दुरुस्ती करून शेतकºयांना डिजिटल स्वाक्षरीचा आॅनलाईन सातबारा उपलब्ध करून दिला. विविध ई-सेवा केंद्र, आपले सरकार आदि ठिकाणी शेतकºयांना हा सातबारा मिळत होताच. त्याशिवाय शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसीलस्तरावरही शेतकºयांना सहज सातबारा उपलब्ध व्हावा म्हणून ‘एटीडीएम’ मशीन बसविल्या. केवळ २० रुपये शुल्काद्वारे या मशीनमधून शेतकºयांना २ मिनिंटात सातबारा मिळत असल्याने शेतकºयांची सातबाराची कटकट संपली. वाशिम जिल्ह्यातील सहा तालुके मिळून एकूण २ लाख ५४ हजार सातबारा असून, आता पुढील हंगामासाठी कर्जाची तयारी, विविध व्यवहारासाठी शेतकरी सातबारा काढण्याचा प्रयत्न करीत असतानाच जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणेच्यावतीने आॅनलाईन सातबारासाठी ‘ओटीपी’ची पद्धत सुरू करण्यात आली. त्यामुळे शेतकºयांना सातबाराच्या संकेतस्थळावर मोबाईल क्रमांक टाकावा लागत होता; परंतु अनेक शेतकºयांकडे अद्यापही मोबाईल नसल्याने त्यांची सातबारा काढण्याची पंचाईत झाली होती. असाच प्रकार इतरही जिल्ह्यात झाल्याने हजारो शेतकºयांनी नॅशनल इंफॉरमेशन सेंटर पुणे (एनआयसी)मार्फत जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडे तक्रारी केल्या. प्रत्यक्षात शेतकºयांना सहज सातबारा उपलब्ध करण्यासाठी संगणकीकरण करण्यात आले असताना ही अडचण निर्माण झाल्याने जमाबंदी आयुक्त कार्यालयाने तातडीने दखल घेत सोमवारपासून ओटीपी पद्धत बंद केली. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)


जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडूनच आॅनलाईन सातबारासाठी ओटीपी अनिर्वाय करण्यात आले होते. तथापि, यामुळे शेतकºयांना अडचणी येत असल्याने शेतकºयांच्यावतीने याबाबत तक्रारी करण्यात आल्या. त्या तक्रारींच्ी दखल घेत आॅनलाईन सातबारा काढण्यासाठी ओटीपी पद्धत बंद करण्यात आली आहे.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी
वाशिम

Web Title: Finally, the 'OTP' method for seven-bara cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.