ठळक मुद्देखरेदी शुभारंभाच्यादिवशी खरेदी नाही नियोजनाचा अभाव


मानोरा : सोयाबीनला हमी दराने भाव मिळण्यासाठी मानोरा बाजार समितीमध्ये नाफेडव्दार सोयाबीन खरेदीला १० नोव्हेंबर रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांच्या हस्ते रितसर उदघाटन करुन खरेदीस सुरुवात करण्यात आली. परंतु बाजार समितीचे कोणत्याच प्रकारचे नियोजन नसल्याने पहिल्या दिवस खरेदीविनाच गेला.

जिल्हा मार्केटींग अधिकारी अकोला यांनी ६ नोव्हेंबर रोजी खरेदी विक्री संघ व बाजार समिती मानोरा यांना रितसर पत्र पाठवून शेतकºयांना आवश्यक असलेले कागदपत्रे आणि आॅनलाईन शेतकºयांच्या नोंदीसंदर्भात सूचना दिल्या होत्या, परंतु बाजार समितीमध्ये कुठल्याच प्रकारचे नियोजन नसल्यामुळे पहिला दिवस निरंक गेला. दरम्यान शेतकºयांसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या नाफेड खरेदीचे उदघाटन आमदार राजेंद्र पाटणी यांचे हस्ते करण्यात आले यावेळी बाजार समिती सभापती संजय रोठे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सुरेंद्र देशमुख, भाजपा तालुकाध्यक्ष ठाकुरसिंग चव्हाण, तांडा सुधारचे सुनिल महाराज, निराधार योजनेचे अध्यक्ष निळकंठ पाटील, बाजार समिती संचालक मिलिंद देशमुख, डॉ. सुहास देशमुख , डॉ. अविनाश लोथे, सुभाष नानोटे, जितेंद्र महाराज, डॉ. हरिष नवराल, अमोल राऊत, संदिप इंगळे, प्रमोद सोळंके यांच्यासह बाजारसमितीचे संचालकांची उपस्थिती होती.