सोनल प्रकल्पातील पाणी अन्यत्र वळविण्यास शेतकऱ्यांचा विरोध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 02:50 PM2018-03-27T14:50:15+5:302018-03-27T14:50:15+5:30

वाशिम : सोनल प्रकल्पावर अवलंबून असलेल्या परिसरातील २० ते २२ गावातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी कडाडून विरोध करीत, २७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

Farmers protest to divert water from Sonal project | सोनल प्रकल्पातील पाणी अन्यत्र वळविण्यास शेतकऱ्यांचा विरोध 

सोनल प्रकल्पातील पाणी अन्यत्र वळविण्यास शेतकऱ्यांचा विरोध 

Next
ठळक मुद्देनगर पालिकेने सोनल प्रकल्पातील पाणी मोतसावंगा प्रकल्पाच्या जॅकवेलमध्ये आणून त्याद्वारे नागरिकांची तहान भागविण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाची ४ कोटीची योजना प्रस्तावित केली होती. सोनल प्रकल्पातील पाणी अन्यत्र वळविण्यात आले तर सोनल परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांची गैरसोय होणार आहे. सोनल प्रकल्पातील पाणी अन्यत्र वळविण्यात येऊ नये, अशी एकमुखी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी यावेळी केली.

वाशिम : मालेगाव तालुक्यातील सोनल प्रकल्पातील पाणी मंगरुळपीर शहरातील नागरिकांसाठी मोतसावंगा प्रकल्पात वळविण्याची योजना मंजूर झाली आहे.  सोनल प्रकल्पावर अवलंबून असलेल्या परिसरातील २० ते २२ गावातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी कडाडून विरोध करीत, २७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी सोनल प्रकल्पातील पाणी अन्यत्र वळविण्यात येऊ नये, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थ, शेतकरी व सोनल प्रकल्प शेती सिंचन बचाव समितीने केली. 

मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणाºया मोतसावंगा प्रकल्पाने तळ गाठल्यामुळे मंगरुळपीर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याचे संकेत आहे. सध्याही येथे पाणीेटंचाई निर्माण झालेली आहे. यावर मात करण्यासाठी मंगरुळपीर नगर पालिकेने सोनल प्रकल्पातील पाणी मोतसावंगा प्रकल्पाच्या जॅकवेलमध्ये आणून त्याद्वारे नागरिकांची तहान भागविण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाची ४ कोटीची योजना प्रस्तावित केली होती. या योजनेला राज्य शासनाने नुकतीच मंजुरात दिली आहे. सोनल प्रकल्पातील पाणी अन्यत्र वळविण्यात आले तर सोनल परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांची गैरसोय होणार आहे.  सोनल प्रकल्पात आता केवळ मृतसाठा उरला असून, या प्रकल्पातून सिंचनही आधीच बंद झाले आहे. या प्रकल्पातून मोतसावंगा प्रकल्पापर्यंत पाणी नेण्यात आले तर सोनल प्रकल्प परिसरातील ग्रामस्थांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे सोनल प्रकल्पातून पाणी नेण्यात येऊ नये, या मागणीसाठी गत १० दिवसांपासून सोनल प्रकल्प परिसरातील सोनाळा, किन्हीराजा, एरंडा, मैराळडोह, हिरंगी, लाठी, येडशी, शेलूबाजार, चोरद, वनोजा, माळशेलू, शेंदुरजना, गोगरी, खेर्डा, नागी, इचा, तपोवन, तºहाळा, पेडगाव, मसोला, गणेशपुर, चिखली आदी गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी लढा उभारला आहे. यापूर्वीदेखील या गावातील नागरिकांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन देत सोनल प्रकल्पातील पाणी अन्यत्र वळविण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. तसेच  सोनल प्रकल्प शेती सिंचन बचाव समितीने गावोगावी बैठका घेऊन ग्रामस्थ व शेतकºयांना जागरूक केले. २७ मार्च रोजीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चाची पूर्वकल्पना २० ते २२ गावातील शेतकरी व ग्रामस्थांना दिली होती. नियोजित तारखेनुसार २७ मार्च रोजी सोनल प्रकल्प परिसरातील २० ते २२ गावातील नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. सोनल प्रकल्पातील पाणी अन्यत्र वळविण्यात येऊ नये, अशी एकमुखी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी यावेळी केली.


सिंचनासाठी जमिनी दिल्या; आता पाणीही हिरावून घेतले जातेय !

 सोनल प्रकल्प उभारताना अहवाल तयार करण्यात आला. त्यावेळी या प्रकल्पाचे पाणी शेतकºयांना सिंचनासाठी राखीव राहील, या पाण्यावर आरक्षण राहणार नाही, असेही नमुद केलेले असल्याचे यावेळी काही शेतकºयांनी सांगितले. सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार असल्याने आमच्या जमिनी आम्ही या प्रकल्पासाठी दिल्या. आता सिंचनाऐवजी पिण्यासाठी आणि तेही अन्यत्र पाणी वळविण्यात येणार असल्याने हा आमच्यावर अन्याय नाही का? असा सवालही शेतकºयांनी उपस्थित केला. या प्रकल्पातील पाणी शेतकºयांच्या सिंचनासाठी हक्काचे असताना या प्रकल्पातून उपसा करुन इतर ठिकाणी हलविण्याचे प्रयोजन काय? असा सवाल उपस्थित करून या प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी राखीव ठेवण्यात यावे. या प्रकल्पातील पाण्याचा वापर शेतकºयांना सिंचनासाठीच झाला पाहिजे, अशी रोखठोक भूमिका शेतकरी व ग्रामस्थांनी घेतली.

Web Title: Farmers protest to divert water from Sonal project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.