मालेगाव महावितरण कार्यालयात शेतकरी संघटनेचे मेनबत्ती आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 03:44 PM2018-10-26T15:44:26+5:302018-10-26T15:45:06+5:30

भारनियमनाचा विरोध: दिवसाला वीज पुरवठा देण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव ( वाशिम ): महावितरणच्या भारनियमनाविरोधात आक्रमक भूमिका घेताना ...

Farmer's organization protest at Malegaon Mahavitaran office | मालेगाव महावितरण कार्यालयात शेतकरी संघटनेचे मेनबत्ती आंदोलन

मालेगाव महावितरण कार्यालयात शेतकरी संघटनेचे मेनबत्ती आंदोलन

Next

भारनियमनाचा विरोध: दिवसाला वीज पुरवठा देण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम): महावितरणच्या भारनियमनाविरोधात आक्रमक भूमिका घेताना स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शुक्रवारी मालेगाव महावितरण कार्यालयावर मेनबत्ती आंदोलन करण्यात आले. रात्री २ वाजता वीज पुरवठा करण्याऐवजी दिवसाचे भारनियमन बंद करून सुरळीत वीज पुरवठा देण्याची मागणी यावेळी अभियंत्यांकडे करण्यात आली. 
रब्बीचा हंगाम सुरू झाला असून, हरभरा व गहू पिकाला पाणी देण्याची आता गरज आहे. यासाठी वीज पुरवठा सुरळीत असणे आवश्यक आहे; परंतु महावितरणच्या भारनियमाने त्यात खोडा निर्माण केला आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भारनियमनाच्या कालावधीशिवायही वीज पुरवठा खंडीत होत राहतो. त्यामुळे हरभरा आणि गहू पिकांना पाणी द्यावे, क से हा प्रश्न शेतकºयांसमोर उपस्थित होत आहे. रात्री २ वाजतानंतर वीज पुरवठा सुरू होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतकºयांची ही समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मालेगाव महावितरण कार्यालयात धडक देण्यात आली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. दिवाळीच्या पूर्वी ही समस्या न सोडविल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी उपविभागीय अभियंत्यांना देण्यात आला.

Web Title: Farmer's organization protest at Malegaon Mahavitaran office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.