मुग, उडिदाच्या बियाण्यांकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 02:52 PM2019-06-24T14:52:26+5:302019-06-24T14:52:32+5:30

वाशिम: यंदा मान्सून लांबणीवर पडल्याने मुग आणि उडिद या पिकांच्या पेरणीची वेळ जवळपास निघून गेली आहे.

farmer not intrested to sowing urad and moog | मुग, उडिदाच्या बियाण्यांकडे शेतकऱ्यांची पाठ

मुग, उडिदाच्या बियाण्यांकडे शेतकऱ्यांची पाठ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: यंदा मान्सून लांबणीवर पडल्याने मुग आणि उडिद या पिकांच्या पेरणीची वेळ जवळपास निघून गेली आहे. आता या पिकांची पेरणी अंगलट येण्याची भिती असल्याने शेतकरी या पिकांच्या बियाण्यांकडे पाठ करीत असल्याचे चित्र पश्चिम वºहाडात पाहायला मिळत आहे. त्यामुळे कमी धोक्याचे पीक असलेल्या सोयाबीनच्या क्षेत्रात यंदा अधिकच वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा रत्तज्यात मान्सूनला मोठा विलंब झाला. त्यामुळेच जुन महिन्याच्या शेवटचा आठवडा सुरू झाला तरी, खरीपाच्या पेरणीला सुरुवात झाली नाही. प्रत्यक्षात मान्सूनपूर्व पावसानंतरच खरीपाची पेरणी अनेक शेतकरी करतात; परंतु यंदा मान्सूनपूर्व पावसाचे प्रमाणही नगण्य राहिले. त्यामुळे जमिनीत ओलावाही निर्माण झाला नाही. आता खरिपातील कमी कालावधीचे पीक असलेल्या मुग आणि उडिदाच्या पेरणीची वेळ निघून जात आहे. शनिवारी राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला तरी, त्यामुळे जमिनीची धूप भरून निघणार नसून, पेरणीला त्यामुळे विलंब होणार आहे. त्यातच पश्चिम वºहाडात कोरडवाहू क्षेत्र अधिक असून, जमिनीचा स्तरही फारसा सुपिक नाही. त्यामुळे मुग आणि उडिदाची पेरणी करणे शेतकऱ्यांसाठी जोखमीचे ठरणार आहे. पेरणीनंतर पावसाने खंड दिल्यास पेरणी उलटेलच शिवाय दुबार पेरणीची संधीही राहणार नाही. त्यामुळे शेतकरी या पिकाच्या बियाण्यांची खरेदी करीत नसल्याचे चित्र दिसत आहे. या पिकांच्या तुलनेत कमी पावसातही तग धरणाºया सोयाबीन बियाण्यांच्या खरेदीवर शेतकºयांनी जोर दिला आहे. त्यात महाबीजने यंदा काही नवे वाण उपलब्ध केले आहे. या वाणांची खरेदी शेतकरी मोठ्या प्रमाणात करीत असल्याची माहिती कृषी सेवा केंद्रांकडून प्राप्त झाली आहे. यावरून यंदा मुग आणि उडिदाचे क्षेत्र कमी होऊ सोयाबीनचे क्षेत्र पूर्वीपेक्षाही अधिक वाढण्याची शक्यता आहे.

पाऊस लांबल्याने मुग आणि उडिदाची पेरणी खोळंबली आहे. त्यामुळे बियाणे खरेदीची घाई आम्ही केली नाही. मुगाची पेरणी जोखमीची ठरणार आहे; परंतु येत्या दोन चार दिवसांत दमदार पाऊस पडला, तर उडिदाची पेरणी करणे शक्य होईल.
- अनिल राठोड
शेतकरी इंझोरी (वाशिम)

यापूर्वीही कधीही मान्सूनला एवढा लिवंब झाला नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबलेल्या आहेत. मुग आणि उडिदाची पेरणी लवकर होणे अपेक्षीत असते. कमी कालावधीची ही पिके शेतकºयांना आधार देणारी ठरतात. आता वेळ निघून जात असल्याने या पिकांची पेरणी करावी की नाही, हा प्रश्न पडला आहे.
-दशरथ पवार
शेतकरी, मंगरुळपीर (वाशिम)

Web Title: farmer not intrested to sowing urad and moog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.