न उगवलेल्या बियाण्यांचा मिळणार मोबदला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 01:27 PM2019-07-10T13:27:49+5:302019-07-10T13:27:54+5:30

जवळपास १३० पेक्षा अधिक बॅगमधील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची तक्रार शेतकºयांनी तालुका कृषी अधिकाºयांकडे केली.

farmer get conponsession for seed not fertile | न उगवलेल्या बियाण्यांचा मिळणार मोबदला!

न उगवलेल्या बियाण्यांचा मिळणार मोबदला!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : यंदाच्या खरीप हंगामात महाबीजचे १३० बॅग सोयाबीन बियाणे न उगवण्याचा प्रकार मानोरा तालुक्यात घडला होता. यामुळे शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. दरम्यान, ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित करुन महाबीजचे लक्ष वेधले. त्याची दखल घेऊन जिल्हा समितीच्यावतीने सलग चार दिवस संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली. यासंदर्भातील प्राथमिक अहवाल महाबीजच्या वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात आला असून, अंतिम अहवालानंतर नेमका किती शेतकºयांंना मोबदला मिळू शकेल, हे निश्चित केले जाणार आहे.
मानोरा तालुक्यातील इंझोरी परिसरात बहुतांश शेतकºयांनी प्रामुख्याने महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांची यंदाच्या खरीप हंगामात पेरणी केली आहे. यातील काही शेतकºयांनी कृषी सेवा केंद्रांकडून जेएस ३३५, हे सोयाबीन वाण विकत घेतले होते. या वाणाच्या लॉट क्रमांक ५६९८ मधील बियाणे पेरणाºया शेतकºयांचे बियाणेच उगवले नसल्याने शेतकºयांना धक्का बसला. जवळपास १३० पेक्षा अधिक बॅगमधील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची तक्रार शेतकºयांनी तालुका कृषी अधिकाºयांकडे केली. लोकमतने या संदर्भात वृत्त प्रकाशित करून कृषी विभागासह महागीज प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर लोकमतचे वृत्त आणि शेतकºयांच्या तक्रारीची दखल घेऊन महाबीजचे प्रतिनिधी, कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाचे अधिकारी यांचा समावेश असलेल्या ५ सदस्यीय पथकाने इंझोरी येथील शिवाराला भेट देऊन काही शेतकºयांच्या पेरणीची पाहणी सुरू केली. चार दिवस पेरणी झालेल्या शेतांची पाहणी केल्यानंतर महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापकांनी या प्रकाराचा प्राथमिक अहवाल त्यांच्या विभागीय कार्यालयाकडे सादर केला. या अहवालानुसार बियाणे न उगवल्याने शेतकºयांचे नुकसान झाल्याचे नमूद असल्याने शेतकºयांना मोबदला मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तथापि, शेतकºयांनी केवळ जेएस ३३५ या वाणाचीच पेरणी केली काय, पेरणी करताना आवश्यक काळजी घेतली काय, यासह ज्या कृषीसेवा केंद्रातून बियाणे विकत घेण्यात आले. त्या कृषीसेवा केंद्राकडीन विक्रीच्या नोंदीची पडताळणी करून अंतिम अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतरच किती शेतकºयांना आणि किती प्रमाणात मोबदला मिळेल, हे निश्चित होणार आहे. गणेशपूर (ता.मंगरूळपीर) येथील शेतकºयांनीही बियाणे न उगवल्याची तक्रार केली आहे.

कृषी सेवा केंद्रांकडून घेतली माहिती
इंझोरी शिवारात महाबीजचे सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारीनुसार शेतकºयांनी कोण्या कृषीसेवा केंद्रातून किती बियाणे घेतले, तसेच कोणत्या लॉटमधील बियाणे घेतले. याबाबत महाबीजच्या पथकाने माहिती घेतली आहे. आता या माहितीनुसार शेतकºयांच्या नुकसानाबाबतचा अंदाज काढण्यात येत असून, शेतकºयांनी जे वाण उगवले नाही, त्याच वाणाची पेरणी केली काय, हेसुद्धा कळणार असल्याचे महाबीजच्या अधिकाºयांनी सांगितले आहे. तथापि, शेतकºयांचे नुकसान झाले असेल, तर त्यांना पूर्ण मोबदला मिळेलच, असेही या अधिकाºयांनी सांगितले.

आम्ही यंदाच्या खरीप हंगामात शेतात महाबीजचे जेएस ३३५ या सोयाबीन वाणाची पेरणी केली असून, पेरलेले बियाणे उगवलेच नाही. याबाबत तक्रार केल्यानंतर शेताची पाहणीही संबंधित पथकाकडून करण्यात आली. आता वस्तूस्थिती आणि नियमानुसार आम्हाला मोबदला लवकरात लवकर मिळावा, अशी अपेक्षा आहे.
- गजानन ढोक
शेतकरी इंझोरी

इंझोरी शिवारातील शेतांना भेटी देऊन पाहणी करण्यात आली आहे. या संदर्भातील प्राथमिक अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करून प्रकाराची माहिती देण्यात आली. आता या संदर्भातील अंतिम अहवाल तयार करण्यात येत असून, सर्व पंचनामे आणि तांत्रिक माहितीनंतरच नेमके शेतकºयांचे किती नुकसान झाले ते निश्चित कळणार आहे.
- डॉ. प्रशांत घावडे
जिल्हा व्यवस्थापक महाबीज, वाशिम

Web Title: farmer get conponsession for seed not fertile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.