‘सी-व्हिजिल’ अ‍ॅपचा दुरूपयोग होवू नये म्हणून निवडणूक विभागाची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 03:27 PM2019-03-19T15:27:00+5:302019-03-19T15:27:06+5:30

वाशिम : निवडणूकी दरम्यान आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारींचा आढावा घेण्यासाठी असलेल्या यंत्रणेतील तृटी दूर करण्यासाठी या ‘सी-व्हिजिल’अ‍ॅपची निर्मिती निवडणुक आयोगाने केली आहे.

Election Department's intervention to prevent the 'C-Vigil' app from being misused | ‘सी-व्हिजिल’ अ‍ॅपचा दुरूपयोग होवू नये म्हणून निवडणूक विभागाची दखल

‘सी-व्हिजिल’ अ‍ॅपचा दुरूपयोग होवू नये म्हणून निवडणूक विभागाची दखल

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : निवडणूकी दरम्यान आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारींचा आढावा घेण्यासाठी असलेल्या यंत्रणेतील तृटी दूर करण्यासाठी या ‘सी-व्हिजिल’अ‍ॅपची निर्मिती निवडणुक आयोगाने केली आहे.
‘सी-व्हिजिल’चा उपयोग केवळ निवडणूक होत असलेल्या राज्यांच्या भौगोलिक सीमा अंतर्गतच करता येईल, फोटो अथवा व्हिडिओ क्लिक केल्यानंतर ’सी-व्हिजिल’ वापरकर्त्यास केवळ ५ मिनिटांचा अवधी मिळेल, हे अ‍ॅप आधीच मोबाईलवर रेकॉर्ड केलेल्या फोटो आणि व्हिडिओंची अपलोड करण्याची परवानगी देणार नाही, अ‍ॅपवरून क्लिक केलेले फोटो अथवा व्हिडिओ थेट फोन गॅलरीमध्ये जतनही करता येणार नाहीत, एकसारख्या तक्रारीच्या दरम्यान किमान ५ मिनिटांचा विलंब करावा लागतो, जिल्हा नियंत्रण कक्ष भरारी पथकाला नेमण्या आधीही डुप्लिकेट, फ्रिवोलस आणि असंबंधित प्रकरणे ड्रॉप करण्याचा पर्याय आहे, ‘सी-व्हिजिल’चा वापर केवळ आदर्श आचारसंहिता उल्लंघनाशी संबंधित खटले दाखल करण्यासाठी केला जाणार, या शिवाय नागरिकांनी तक्रारी नोंदवण्यासाठी भारत निवडणुक आयोगाच्या मुख्य वेबसाइटचा वापर करावा, अथवा १८००१११९५०, किंवा राज्य संपर्क केंद्रावर १९५० मध्ये राष्ट्रीय संपर्क केंद्राला कॉल करावा.
यासाठी ‘सी-व्हिजिल’ करता येईल तक्रार
-मतदारांना पैसा, मद्य आणि आमली पदार्थांचे वाटप, शस्त्रसाठा अथवा शस्त्र वापर, मतदारांना मारहाण अथवा दमबाजीच्या प्रकारात, जमावाला चिथावणीखोर भाषण देणे, पेड न्यूज आणि फेक न्यूज संबंधी, मतदारांना आमिष म्हणून वस्तूंचा वापर, मतदान केंद्रापर्यंत मतदारांची मोफत वाहतूक करणे, उमेदवाराच्या मालमत्ता अपात्रते संबंधी व इतर ‘सी-व्हिजिल’ची तक्रार योग्य असल्यास संबंधितांवर प्राथमिक माहिती अहवाल (एफआयर) नोंदविला जाईल, संबंधितांवर क्रिमीनल अ‍ॅक्शन होणार, कारवाईतील रोख रक्कम जप्त होणार, कारवाईतील मद्य अथवा आमली पदार्थ जप्त होणार आहे.

Web Title: Election Department's intervention to prevent the 'C-Vigil' app from being misused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.