वाशिममधील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहाला डॉ. विकास महात्मे यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 06:03 PM2019-01-20T18:03:09+5:302019-01-20T18:04:43+5:30

वाशिम : खासदार डॉ. विकास महात्मे यांनी वसतिगृहाला भेट दिली असता, त्याठिकाणी सुरक्षा रक्षक अथवा एकही कर्मचारी हजर नसल्याचे दिसून आले. यामुळे मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

Dr. vikas mahatme visit Government Hostel of tribal girls in Washim | वाशिममधील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहाला डॉ. विकास महात्मे यांची भेट

वाशिममधील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहाला डॉ. विकास महात्मे यांची भेट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरातील सिव्हिल लाईनस्थित मुलींच्या शासकीय आदिवासी वसतिगृहातील गृहपालाच्या पतीने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याच्याविरूद्ध १७ जानेवारीला गुन्हे दाखल झाले. एवढ्या गंभीर स्वरूपातील घटना घडूनही वसतिगृहाच्या ढेपाळलेल्या कारभारात कुठलीच सुधारणा झाली नसून रविवार, २० जानेवारीला खासदार डॉ. विकास महात्मे यांनी वसतिगृहाला भेट दिली असता, त्याठिकाणी सुरक्षा रक्षक अथवा एकही कर्मचारी हजर नसल्याचे दिसून आले. यामुळे मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
वसतिगृहातील गृहपाल महिलेचा पती रविकांत पेठकर हा गेल्या अनेक दिवसांपासून छळ करित होता. त्याने १७ जानेवारीला वाईट उद्देशाने आपला हात धरून विनयभंग केला. तसेच याबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी पेठकर यास अटक करून त्याच्याविरूद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले. दरम्यान, या गंभीर स्वरूपातील घटनेनंतर वसतिगृहाचा कारभार सुधारायला हवा होता. मात्र, वाशिममधील धनगर समाजाच्या आक्रोश महामेळाव्यासाठी आलेले डॉ. विकास महात्मे यांनी अचानक वसतिगृहाला भेट दिली असता, त्याठिकाणी मुलींशिवाय वसतिगृहाचा एकही कर्मचारी हजर नसल्याचे आढळले. पाहणीदरम्यान वसतिगृहातील प्रत्येक खोलीत ३० ते ३५ मुलींना वास्तव्य करावे लागत असून अन्य स्वरूपातील अनेक समस्या सद्या त्याठिकाणी उद्भवल्याचे डॉ. महात्मे यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी वसतिगृहातील मुलींशी संवाद साधून त्यांच्या अडचणी शासनापर्यंत पोहचविण्यात येतील, अशी ग्वाही दिली.

Web Title: Dr. vikas mahatme visit Government Hostel of tribal girls in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.