धूळ पेरणीची जोखीम पत्करू नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 05:42 PM2019-05-19T17:42:58+5:302019-05-19T17:43:05+5:30

शेतकºयांनी धूळ पेरणीची जोखीम पत्करू नये, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Do not take risk the dust sowing! | धूळ पेरणीची जोखीम पत्करू नका !

धूळ पेरणीची जोखीम पत्करू नका !

Next

वाशिम : पश्चिम वऱ्हाडात यंदा तीव्र दुष्काळी स्थिती ओढ़वली आहे. त्यामुळे जमिनीत आर्द्रता उरली नाही. अशात शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केल्यास बिया कुजण्याची आणि किडींचा प्रादूर्भाव वाढण्याची भिती आहे. त्यामुळे शेतकºयांनी धूळ पेरणीची जोखीम पत्करू नये, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
पश्चिम वºहाडातील संपूर्ण बुलडाणा जिल्हा, अकोला जिल्ह्यातील पाच तालुके, तर वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यासह इतर दोन महसूल मंडळात शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. तथापि, संपूर्ण पश्चिम वºहाडातच दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत. प्रकल्प, विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या असून, जमिनीतील ओलावा पूर्णपणे नष्ट झाला आहे. अशात कापूस उत्पादक शेतकºयांनी धूळ पेरणी केल्यास कपाशीचे वियाणे कुजून शेतकºयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यातच कपाशीवर पुन्हा किडींचा प्रादूर्भाव होण्याची भितीही आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकºयांनी धूळ पेरणीची जोखीम पत्करु नये, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात येत असून, या संदर्भात शेतीशाळांचे आयोजन करुन शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

Web Title: Do not take risk the dust sowing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.