वाशिममध्ये ८ डिसेंबरपासून जिल्हास्तरीय युवा महोत्सव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 08:32 PM2017-12-04T20:32:22+5:302017-12-04T20:35:34+5:30

वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने येत्या ८ डिसेंबरपासून जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलमध्ये होणाºया या महोत्सवात युवा कलावंतांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

District level youth festival from Washim on 8th December! | वाशिममध्ये ८ डिसेंबरपासून जिल्हास्तरीय युवा महोत्सव!

वाशिममध्ये ८ डिसेंबरपासून जिल्हास्तरीय युवा महोत्सव!

Next
ठळक मुद्देक्रीडा अधिकारी कार्यालयाचे आयोजन युवा कलावंतांनी सहभागी होण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: स्थानिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने येत्या ८ डिसेंबरपासून जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलमध्ये होणा-या या महोत्सवात युवा कलावंतांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या महोत्सवात १५ ते ३५ वयोगटातील युवक-युवती सहभागी होऊ शकतात. त्यासाठी संबंधित स्पर्धकांना जन्मतारखेचा दाखला व नजिकच्या काळातील छायाचित्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. वेशभूषा, रंगभूषा आदी व्यवस्था स्पर्धकास स्वत:च करावी लागेन. केवळ विद्यूत आणि ध्वनिक्षेपकाची सोय वाशिम क्रीडा अधिकारी कार्यालय करणार आहे. साथसंगतीकरिता आवश्यक ते सह कलाकार व वाद्यवृंदांची जबाबदारी त्या-त्या कलावंतांची राहील, असे कळविण्यात आले. या युवा महोत्सवात लोकनृत्य, लोकगित, एकांकिता (इंग्रजी/हिंदी), शास्त्रीय गायन, बासरी, विणा, तबला, मृदंग, हार्मोनियम, शास्त्रीय नृत्य (मणिपूरी, ओडिसी, भरतनाट्यम, कथक, कुचीपुडी आदी), वक्तृत्व आदी कलाप्रकारांचा समावेश करण्यात आलेला आहे. 

Web Title: District level youth festival from Washim on 8th December!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.