मालेगाव : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा शाळेत प्रवेश घेतला, तो ७ नोव्हेंबर हा दिवस शाळांमध्ये शाळा प्रवेश दिन म्हणून साजरा करण्यात आला.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित व्याख्याने, निबंध स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा आदी उपक्रम मालेगाव तालुक्यातील शाळांमध्ये राबविण्यात आले. 

 स्थानिक ना.ना. मुंदडा विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मूंदड़ा विद्यालयाचे उपप्राचार्य सतीश नवगजे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन प्रा. संजाब वाहेकर होते. यावेळी  पर्यवेक्षक वसंतराव अवचार आणि संजय साबळे उपस्थि होते. सर्वप्रथम माता सरस्वती अणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रा. वाहेकर म्हणाले की साताºयातील राजवाडा चौकातील प्रतापसिंग शाळेमध्ये ७ नोव्हेंबर १९०० रोजी बाबासाहेबांना दाखल करण्यात आले. शाळेत दाखल करताना त्यांचे नाव भिवा, असे नोंदविण्यात आले. प्रतापसिंग शाळेच्या दाखल रजिस्टरच्या १९१४ क्रमांकासमोर बालभिवाची स्वाक्षरी आहे. संबंधित प्रशासनाने हा ऐतिहासिक ठेवा आजही जतन करून ठेवला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: शिकले आणि खºया अर्थााने शैक्षणिक क्रांती घडविली. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस आजच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरावा म्हणून शाळा प्रवेश दिन साजरा केला जात आहे, असे ते म्हणाले. संचालन आणि आभार प्रदर्शन संजय साबळे यांनी केले. कार्यक्रमाला मुंदडा विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती. तालुक्यातील शाळांमध्ये  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन आदी उपक्रम राबविण्यात आले.