जलकुंभात आढळला मृतावस्थेतील कुत्रा; पाणीनमुने तपासणीसाठी पाठविले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:47 PM2019-06-21T12:47:17+5:302019-06-21T12:47:24+5:30

मृतावस्थेतील कुत्रा आढळून आल्यानंतर, २१ जून रोजी सकाळपासूनच जलशुद्धीकरण केंद्राची स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

Dead dog found in Water tank; Water is sent for inspection! | जलकुंभात आढळला मृतावस्थेतील कुत्रा; पाणीनमुने तपासणीसाठी पाठविले !

जलकुंभात आढळला मृतावस्थेतील कुत्रा; पाणीनमुने तपासणीसाठी पाठविले !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम) : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वाईगौळ येथील २८ गावे पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ असलेल्या जलकुंभात २० जून रोजी मृतावस्थेतील कुत्रा आढळून आल्यानंतर, २१ जून रोजी सकाळपासूनच जलशुद्धीकरण केंद्राची स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. दरम्यान, या जलकुंभातील पाणी नमुने तपासणीसाठी पाठविले असून, पशूसंवर्धन विभागाकडून कुत्र्याच्या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाईची पुढील दिशा ठरणार आहे.
मानोरा तालुक्यातील वाईगौळ येथे महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या २८ गावे पाणी पुरवठा योजनेंतर्गत जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळ एक जलकुंभ बांधण्यात आला असून, त्यातील पाणी ग्रामस्थांना नळ योजनेद्वारे सोडले जाते. गुरूवार, २० जून रोजी  सकाळी वाईगौळ येथील किशोर प्रकाश राठोड या युवकाने सहज म्हणून जलशुद्धीकरण केंद्रावर जावून पाहणी केली असता त्याला पंपाखालील जलकुंभात काळ्या रंगाचा कुत्रा मृतावस्थेत पडून असल्याचे दिसून आले. याप्रकाराबद्दल नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, दोषींविरूद्ध कारवाईची मागणी पुढे आली. शुक्रवारी सकाळपासूनच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकारी, कर्मचाºयांनी जलशुद्धीकरण केंद्रासभोवताल स्वच्छता मोहिम राबविली.  ज्या टाकीत कुत्रा पडला होत्या, त्या टाकातील संपूर्ण पाणी काढून शुद्धीकरण कºयात आले तसेच जलशुद्धीकरण केंद्राचेही शुद्धीकरण केले. या परिसरातील झाडेझूडपे हटविण्यात आली तसेच संपूर्ण परिसरातील स्वच्छता केली. २८ गावातील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यात आल्याचे शाखा अभियंता व्ही. जे. खराटे यांनी सांगितले. ज्या टाकीत कुत्रा आढळून आला, त्या टाकातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत तसेच कृत्र्याचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील दिशा ठरणार आहे. पाण्याच्या टाकीत साचलेला गाळ काढण्यात आला. गाळाचा ढिग पाहून गत कित्येक वर्षांपासून टाक्याची साफसफाई केली नसल्याचे दिसून येते. वाईगौळ येथील या प्रकाराची पुनरावृत्ती अन्यत्र होऊ नये यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील जलकुंभाची स्वच्छता मोहिम राबविणे आवश्यक ठरत आहे.

Web Title: Dead dog found in Water tank; Water is sent for inspection!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.