वृक्ष लागवडीसाठी शिरपूर उपबाजारात लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 01:45 PM2019-06-03T13:45:06+5:302019-06-03T13:45:51+5:30

शिरपूर कृषी बाजारात पदाधिकारी, कर्मचाºयांची लंगबग सुरू झाली असून, वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्यात येत आहेत.

For the cultivation of trees Shirpur subdivision | वृक्ष लागवडीसाठी शिरपूर उपबाजारात लगबग

वृक्ष लागवडीसाठी शिरपूर उपबाजारात लगबग

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) : जिल्ह्यात शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेला येत्या १ जुलैपासून प्रारंभ होत आहे. या योजनेत निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाºया शिरपूर कृषी बाजारात पदाधिकारी, कर्मचाºयांची लंगबग सुरू झाली असून, वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्यात येत आहेत.
शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत येत्या १ जुलैपासून जिल्ह्यात ४३ लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. वेगवेगळे प्रशासकीय विभाग, निमशासकीय संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र उद्दिष्ट निर्धारित केले असून, यात बाजार समित्यांचाही समावेश आहे. यात मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाºया शिरपूर कृषी बाजारासाठी ४०० वृक्षांचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट निर्धारित मुदतीच्या पूर्वीच पूर्ण होण्यासाठी उपबाजारातील पदाधिकारी आणि कर्मचारी परिश्रम घेत असून, उद्दिष्टानुसार खड्डे खोदण्यास सुरुवात झाली आहे. उपबाजार परिसरात सभापती किसनराव घुगे, सचिव दिलीप वाझुळकर यांच्या मार्गदर्शनात ४०० वृक्षांची करण्यात येणार आहे. यासाठी उपकेंद्राचे कर्मचारी शंकर चोपडे, पंजाब वाघ, संतोष भालेराव, अमोल वाझुळकर  व काही मजूर प्रयत्नरत आहेत.

Web Title: For the cultivation of trees Shirpur subdivision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.