जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात आॅनलाईन दाखल करता येणार तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 04:57 PM2018-06-16T16:57:48+5:302018-06-16T16:57:48+5:30

वाशिम: जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यात आता ‘ई-महिला लोकशाही दिन’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून १८ जून २०१८ च्या जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनापासून महिलांना ई-मेल किंवा व्हाटस्अपद्वारे आपली तक्रार दाखल करता येणार आहे.

Complaint to file online on district-level women's democracy day | जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात आॅनलाईन दाखल करता येणार तक्रार

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात आॅनलाईन दाखल करता येणार तक्रार

Next
ठळक मुद्देप्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या निदेर्शानुसार आता ‘ई-महिला लोकशाही दिन’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनापासून महिलांना ई-मेल किंवा व्हाटस्अपद्वारे आपली तक्रार दाखल करता येणार आहे.

 
वाशिम: जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यात आता ‘ई-महिला लोकशाही दिन’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून १८ जून २०१८ च्या जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनापासून महिलांना ई-मेल किंवा व्हाटस्अपद्वारे आपली तक्रार दाखल करता येणार आहे. त्यामुळे त्याचा येण्या-जाण्याच्या खर्चात व वेळेची बचत होणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी दिली. 
पिडीत व समस्याग्रस्त महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा, या दृष्टीने प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.  या लोकशाही दि नात तक्रार करण्यासाठी प्रवासाचा खर्च अर्जदारांना करावा लागतो. हा भुर्दंड टळून जलदगतीने तक्रार व्हावी या उद्देशाने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या निदेर्शानुसार आता ‘ई-महिला लोकशाही दिन’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून १८ जून २०१८ च्या जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनापासून महिलांना ई-मेल किंवा व्हाटस्अपद्वारे आपली तक्रार दाखल करता येणार आहे. त्यामुळे त्याचा येण्या-जाण्याच्या खर्चात व वेळेची बचत होणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी दिली. ई-महिला लोकशाही दिन अंतर्गत जिल्ह्यातील कोणतीही महिला आपल्या राहत्या ठिकाणाहून किंवा ज्या ठिकाणी अथवा गावातील सेतू सुविधा केंद्र किंवा मोबाईलची सुविधा असेल तेथून ईमहिला लोकशाही वाशिम जीमेल डॉट कॉम ाा ई-मेल आयडीवर किंवा ८३७९९२९४१५ या व्हॉटस्अ‍ॅप क्रमांकावर आपली तक्रार पाठवू शकतात. जिल्ह्यातील महिलांच्या कोणत्याही तक्रारी असल्यास त्यांनी ई-महिला लोकशाही दिनात दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राठोड यांनी केले आहे.

Web Title: Complaint to file online on district-level women's democracy day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.