युवकांसह नागरिकांनी राबविली स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 10:17 PM2017-10-22T22:17:05+5:302017-10-22T22:20:02+5:30

मालेगाव : तालुक्यातील मुंगळा येथे हनुुमान मंदीर परिसरात नरक चतुर्दशी निमीत्त सकाळी ९ वाजता श्री संताजी महाराज बहुउद्देशीय संस्थेने स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

Cleanliness campaign implemented by citizens with youth | युवकांसह नागरिकांनी राबविली स्वच्छता मोहीम

युवकांसह नागरिकांनी राबविली स्वच्छता मोहीम

Next
ठळक मुद्देमुंगळा येथील कार्यक्रम संताजी महाराज संस्थेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : तालुक्यातील मुंगळा येथे हनुुमान मंदीर परिसरात नरक चतुर्दशी निमीत्त सकाळी ९ वाजता श्री संताजी महाराज बहुउद्देशीय संस्थेने स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. राजेश दळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी या स्वच्छता अभियानात सहभागी होवुन स्वच्छतेबद्दल युवकांना मार्गदर्शन केले.  या दिवशी श्री संताजी महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातुन युवकांनी हाती घेतलेला स्वच्छतेचा उपक्रम खरोखर प्रेरणा देणारा आहे. प्रत्येकजनाने आपआपली घरे, प्रतिषठाने स्वच्छ केले. मात्र, गावातील आपला परिसर, देवालयाकडे दुर्लक्ष आहे. नागरीकांनी आपल्या घरा सोबतच घराबाजुचा, धार्मीक स्थळांचा परिसरही स्वच्छ केला पाहीजे. यावेळी महाराष्ट्र मल्टीस्टेट बँकेचे अमोल राऊत, विजय डोंबळे, राहुल दळवी, गजानन डोंबळे,  गजानन हमाणे, नंदकिशोर वनस्कर, अजय वाघ, पुरूषोत्तम डोंबळे, अक्षय क्षिरसागर, शुभम डोंबळे, अनिकेत डोंबळे, अभिजीत हमाणे सह श्री संताजी महाराज संस्थेचे सदस्यांची उपस्थिती होती.

Web Title: Cleanliness campaign implemented by citizens with youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.