नागरिकांचा मतदानावर बहिष्कार अन् उमेदवारांसाठी गावात प्रचारबंदी

By admin | Published: September 17, 2014 01:14 AM2014-09-17T01:14:10+5:302014-09-17T01:14:10+5:30

कारंजालाड येथील गौतमनगर परिसरात नागरिकांनी लावले फलक

Citizens boycott voting and publicity ban for candidates | नागरिकांचा मतदानावर बहिष्कार अन् उमेदवारांसाठी गावात प्रचारबंदी

नागरिकांचा मतदानावर बहिष्कार अन् उमेदवारांसाठी गावात प्रचारबंदी

Next

कारंजालाड (वाशिम) : स्थानिक गौतमनगर परिसरातील पक्या रस्त्यांचा प्रश्न मागील ३0 वर्षापासून
रखडलेलाच आहे. पक्क्या रस्त्याच्या मागणीसाठी अनेक लोकप्रतिनिधींचे उंबरवठे झीजवलेत. मात्र प्रश्नाची साधी दखलही न घेतल्याने आगामी विधानसभेच्या निवडणुकीवर चक्क बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. परिसरातील नागरिकांनी तर चक्क उमेदवारांना प्रचाराकरिता बंदी असल्याचे नामफलक या परिसरातील नागरिकांनी या भागात लावले आहे.
नागरिकांनी यापूर्वी १४ जुलै २0१४ रोजी तहसीलदार यांना वरिल मागणीचे निवेदन केले होते व त्यात आगामी विधानसभा निवडणुकीवर सामुहिक बहिष्कार टाक ण्याचा इशारा दिला होता. मात्र या निवेदनाची दखल प्रशासन अथवा लोकप्रतिनिधींनी घेतली नाही. त्यामुळे गौतमनगर, रमाई परिसर, आकाशदीप कॉलनी, गुरूदेवनगर, नामदेव नगर, शांतीनगर, लक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांचा संयमाचा अंत होऊन अखेर त्यांनी येणार्‍या विधानसभा निवडणुकीवर सामुहिकरित्या बहिष्कार टाकला आहे.

Web Title: Citizens boycott voting and publicity ban for candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.