शेतमालाची आयात रोखण्यासाठी सरकारी धोरणात बदल आवश्यक!-योगगुरू रामदेव बाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 02:01 AM2018-02-28T02:01:29+5:302018-02-28T02:01:29+5:30

कारंजा लाड : शेतक-यांना सुखी करण्यासाठी शेतमालाची देशात होणारी आयात रोखणे गरजेचे आहे. यासाठी सरकारी धोरणात बदल आवश्यक आहे, असे प्रतिपादन योगगुरू स्वामी रामदेवबाबा यांनी कारंजा येथील शेतकरी मेळाव्यात २७ फेब्रुवारी रोजी केले.

Changes in government policy to check imports of farmland are necessary! -Guru Ramdev Baba | शेतमालाची आयात रोखण्यासाठी सरकारी धोरणात बदल आवश्यक!-योगगुरू रामदेव बाबा

शेतमालाची आयात रोखण्यासाठी सरकारी धोरणात बदल आवश्यक!-योगगुरू रामदेव बाबा

Next
ठळक मुद्दे योगगुरू रामदेव बाबांचे प्रतिपादन : कारंजा येथील शेतकरी मेळावा उत्साहात


लोकमत न्युज नेटवर्क
कारंजा लाड : शेतक-यांना सुखी करण्यासाठी शेतमालाची देशात होणारी आयात रोखणे गरजेचे आहे. यासाठी सरकारी धोरणात बदल आवश्यक आहे, असे प्रतिपादन योगगुरू स्वामी रामदेवबाबा यांनी कारंजा येथील शेतकरी मेळाव्यात २७ फेब्रुवारी रोजी केले.
आमदार राजेंद्र पाटणी यांच्या पुढाकाराने पतंजली योग समिती, महिला पतंजली योग समिती, युवा भारत, पतंजली किसान सेवा समिती तसेच भारत स्वाभिमान यांच्या आयोजित कारंजा येथील महावीर ब्रम्हचारी आश्रम परिसरात आयोजित  शेतकरी मेळाव्याला राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राज्याचे कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार राजेंद्र पाटणी, पतंजली योग समितीचे रूपेश लढा विष्णू भुतडा, किसान सेवा समितीचे राज्य प्रभारी राधेश्याम धूत, महिला पतंजली योग्य समितीच्या भारती शेंडे, शंकर नागापुरे, राम व्यवहारे, भाजपा तालुका अध्यक्ष राजीव काळे आदींची उपस्थिती होती. स्वामी रामदेव बाबा म्हणाले की, शेतकºयांनी रासायनिक शेतीऐवजी सेंद्रिय शेतीचा वापर करावा. कमी खर्च लागणारे अलवेरा, गुळवेल, आवळा, कोरफळ आदी वनस्पतींसारखी पिके घेऊन शेती करावी. या वनस्पतीला आम्ही भाव देऊन शेतकरी सुखी बनवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. आपल्या देशामध्ये विदेशी शेतकºयांची हकालपट्टी झाली पाहिजे. आपण पाळलेल्या गाईचे गोमूत्र आम्ही ८ ते १० रुपये लिटरने विकत घेतो. गायीच्या तुपालासुद्धा महत्त्व असल्याचे सांगून, गोमूत्रावरसुद्धा प्रक्रिया करून आरोग्यासाठी गोमूत्राचे महत्त्व विषद केले. शेतकºयांच्या हितासाठी किसान सेवा समिती पुढे होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मतदानाची गरज असल्याने विद्यमान सरकार शेतकºयांसाठी योजना बनवेलच, असा आशावादही रामदेव बाबांनी व्यक्त केला. आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामुळे कांरजा शहरात येण्याचा योग आला असल्याचा आवर्जुन उल्लेख करत योगगुरूने आमदार पाटणी यांचे आभार व्यक्त केले. यावेळी रामदेव बाबांनी उपस्थिताना योगाचे धडे दिले तसेच व्यसनमुक्त या विषयावर मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकेतून आमदार पाटणी यांनी कारंजा तालुक्यातील शेतकºयांची परिस्थिती मांडली. आपल्या किसान पतंजली समितीकडून शेतकºयांना मदतीची गरज आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या शेतकºयांना धीर देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. यानंतर पाशा पटेल म्हणाले की, गेल्या ४० वर्षांपासून शेतकरी हा शेतात राबराब राबत आहे. तरीसुद्धा संसाराचा आर्थिक खर्च शेतीवर भागवू शकत नाही. यामुळे शेतकºयांना आत्महत्या करावी लागते. शेतकºयांच्या या परिस्थितीला सरकारी धोरण जबाबदार आहे. भारत सरकारने पशुधनासाठी दहा हजार कोटी रुपयांचे बजेट केले आहे. जीवन सुखी करण्यासाठी शेतकºयांनी पशुधनाचा वापर करून सेंद्रिय शेती करावी, असा सल्ला त्यांनी दिला. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रत्येक शेतकºयाने कमी खर्चात शेती करून सेंद्रिय शेतीकडे वळावे, असा सल्ला दिला. 
शेतकरी मेळावा व अन्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमदार राजेंद्र पाटणी मित्र मंडळ, पतंजली योग समिती, महिला पतंजली योग समिती, युवा भारत व पतंजली किसान सेवा समिती, भारत स्वाभिमान व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. यावेळी सेंद्रिय शेती करणाºया शेतकºयांचा सन्मान रामदेव बाबा यांनी केला. उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवला होता. मेळाव्याला शेतकºयांसह महिलांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
 

Web Title: Changes in government policy to check imports of farmland are necessary! -Guru Ramdev Baba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.