Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी आदिवासी कला संच सज्ज !

By संतोष वानखडे | Published: November 15, 2022 05:43 AM2022-11-15T05:43:44+5:302022-11-15T05:44:45+5:30

Bharat Jodo Yatra : वाशिम जिल्ह्यात १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजतादरम्यान खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा वाशिम जिल्हा सिमेवरील राजगाव हद्दीत दाखल होणार आहे.

Bharat Jodo Yatra: Tribal arts set ready to welcome Bharat Jodo Yatra! | Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी आदिवासी कला संच सज्ज !

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी आदिवासी कला संच सज्ज !

googlenewsNext

- संतोष वानखडे 
वाशिम - जिल्ह्यात १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजतादरम्यान खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रावाशिम जिल्हा सिमेवरील राजगाव हद्दीत दाखल होणार आहे. या यात्रेचे स्वागत करण्यासाठी गोंडी सांस्कृतिक आदिवासी कला संच, परतवाडा जि. यवतमाळ सज्ज झाला आहे. यानिमित्तानेआदिवासी कला परंपरेचे दर्शन घडविले जाणार आहे.

सोमवारी रात्रीपासूनच हजारो नागरिकांसह विविध क्षेत्रांतील मंडळी या यात्रेच्या स्वागतासाठी राजगाव येथील परिसरात उभारलेल्या भव्य मंडपात मुक्कामाला थांबली आहे. विविध लोक परंपरा सादर करणारी जिल्ह्यासह परजिल्ह्यातील पथकेही या ठिकाणी आली आहेत.

भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी ढोलताशा व पारंपारिक साहित्यासह पांढरकवडा (जि. यवतमाळ) येथील आदिवासी समाजबांधव आपल्या  पथकासह सज्ज आहेत. गोंडी सांस्कृतिक आदिवासी कला संचात एकूण ३० जणांचा समावेश आहे. आपल्या पारंपारिक वेशभूषा, मोरपंखी टोप्या, तुतारीसह आदिवासी समाजबांधव खासदार राहुल गांधी यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे. वाशीम जिल्हा सिमेवर रंगीत तालीमही घेण्यात आली.

Web Title: Bharat Jodo Yatra: Tribal arts set ready to welcome Bharat Jodo Yatra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.