ग्रामसेवकाच्या अनुपस्थितीत झाली मेडशी आठवडी बाजारातील ओट्यांची हर्रासी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 03:43 PM2018-03-24T15:43:33+5:302018-03-24T15:43:33+5:30

मेडशी (वाशिम) : आठवडी बाजारातील ओट्यांची दरवर्षी हर्रासी केली जाते. त्यानुसार, यंदाही हर्रासी घेण्यात आली; परंतु ती ग्रामसेवकाच्या अनुपस्थितीत झाल्याने गावात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. 

auction of market medshi | ग्रामसेवकाच्या अनुपस्थितीत झाली मेडशी आठवडी बाजारातील ओट्यांची हर्रासी!

ग्रामसेवकाच्या अनुपस्थितीत झाली मेडशी आठवडी बाजारातील ओट्यांची हर्रासी!

googlenewsNext
ठळक मुद्देमेडशी येथे आठवडी बाजारातील ओट्यांच्या हर्रासीतून ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. प्रशासकीय अधिकाऱ्याविना बाजारातील ओट्यांची हर्रासी होणे, ही ग्रामपंचायत इतिहासातील पहिलीच घटना ठरली आहे.

मेडशी (वाशिम) : आठवडी बाजारातील ओट्यांची दरवर्षी हर्रासी केली जाते. त्यानुसार, यंदाही हर्रासी घेण्यात आली; परंतु ती ग्रामसेवकाच्या अनुपस्थितीत झाल्याने गावात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. 
मेडशी येथे आठवडी बाजारातील ओट्यांच्या हर्रासीतून ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. असे असताना सरपंचांच्या उपस्थितीत; पण प्रशासकीय अधिकाऱ्याविना बाजारातील ओट्यांची हर्रासी होणे, ही ग्रामपंचायत इतिहासातील पहिलीच घटना ठरली आहे.
हर्रासीमध्ये सहभागी झालेल्या व्यावसायिकांनी आठवडी बाजारात सुविधांचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, हा प्रश्न व्यावसायिकांनीच त्यांच्या स्तरावर सोडवावा, असे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, बाजारातील सुविधांचा प्रश्न ऐरणीवर असताना प्रशासकीय अधिकारी ही समस्या निकाली काढण्याकामी उदासिनता बाळगत असल्याचे दिसून येत आहे. 

व्यावसायिकांकडून अनामत रक्कम स्विकारणे, हर्रासीमधील अटी व शर्ती व्यावसायिकांना समजावून सांगणे, ही जबाबदारी ग्रामसेवकाची असल्याने आठवडी बाजारातील ओट्यांच्या हर्रासी प्रक्रियेत त्यांनी हजर राहणे आवश्यक होते. याबाबत चौकशी केली जाईल.
- व्ही.आर. येनकर, विस्तार अधिकारी, पंचायत समिती, मालेगाव

Web Title: auction of market medshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.