जलनायकांना दिले जलसाक्षरता प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 03:06 PM2018-12-18T15:06:42+5:302018-12-18T15:07:21+5:30

वाशिम : विभागीय जलसाक्षरता केंद्र डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती येथे १४ ते १७ डिसेंबर या दरम्यान अमरावती विभागातील जलनायकांना जलसाक्षरतेसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले.

Aquaculture training given in washim | जलनायकांना दिले जलसाक्षरता प्रशिक्षण

जलनायकांना दिले जलसाक्षरता प्रशिक्षण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विभागीय जलसाक्षरता केंद्र डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती येथे १४ ते १७ डिसेंबर या दरम्यान अमरावती विभागातील जलनायकांना जलसाक्षरतेसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील १० पेक्षा अधिक जलनायकांचा समावेश होता.
 प्रशिक्षक किशोर वरूंबे यांनी पाण्याचा ताळेबंद, पाण्याचे नियोजन याबाबत मार्गदर्शन केले. भूजल सर्वेक्षण अधिकारी संजय कº्हाड यांनी विविध विषयावर सविस्तर माहिती दिली. नद्याचा उगम व महत्व याबाबत डॉ. निलेश हेडा यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून विविध नद्यांचे छायाचित्र दाखवून सविस्तर माहिती दिली. प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. जलसाक्षरता केंद्राचे  कार्यकारी संचालक तुकाराम टेकाळे यांनीदेखील जलसाक्षरतेसंदर्भात मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाला तुषार वडतकर, राजेंद्र जगताप, पंकज शिरमाते, संचालक संजय बाहेकर, किशोर पांढरकर, धीरज थूल, विनोद आढाऊ यांचे सहकार्य लाभले.
या जलसाक्षरता प्रशिक्षणात वाशिम येथील जलनायक प्रवीण पट्टेबहादूर  जलनायक भास्कर गुडदे , श्याम सवाई, प्रभू कांबळे, सुनीता कांबळे, सोनल तायडे, रवींद्र इंगोले आदींनी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल सन्मानपत्र देवून त्यांना सन्मानित करण्यात आले.

Web Title: Aquaculture training given in washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.