‘अंनिस’तर्फे ‘जवाब दो’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 08:23 PM2017-08-20T20:23:13+5:302017-08-20T20:24:09+5:30

वाशिम : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष व थोर विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन चार वर्ष पूर्ण झाली. परंतु अजूनही शासन मारेकºयांचा शोध घेतला नाही. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ या नावाने अभियान सुरू केले असून, याअंतर्गत २० आॅगस्ट रोजी वाशिम शहरातून निर्भय मॉर्निंग वॉक रॅली काढण्यात आली तसेच ‘जवाब दो’ आंदोलनाला सुरूवात झाली. 

The 'answer two' movement by 'Anyan' | ‘अंनिस’तर्फे ‘जवाब दो’ आंदोलन

‘अंनिस’तर्फे ‘जवाब दो’ आंदोलन

Next
ठळक मुद्देडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला चार वर्ष पूर्णअंनिसच्या वाशिम शाखेतर्फे ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ अभियान सुरूशहरातून काढण्यात आली निर्भय मॉर्निंग वॉक रॅली

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष व थोर विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन चार वर्ष पूर्ण झाली. परंतु अजूनही शासन मारेकºयांचा शोध घेतला नाही. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ या नावाने अभियान सुरू केले असून, याअंतर्गत २० आॅगस्ट रोजी वाशिम शहरातून निर्भय मॉर्निंग वॉक रॅली काढण्यात आली तसेच ‘जवाब दो’ आंदोलनाला सुरूवात झाली. 
सकाळी ६ वाजता शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ‘निर्भय मॉर्निग वॉक’ ही रॅली पाटणी चौकमार्गे डॉ. आंबेडकर चौकामध्ये रॅली आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन संविधान विरोधी कार्य करणाºया शक्तिचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच दाभोलकर, कॉ गोविंद पानसरे, प्राध्यापक एम. एम. कलबुर्गी यांच्या खुनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी सकाळी १० वाजतापासून डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात स्वाक्षरी मोहिमेस सुरूवात झाली. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व  समविचारी पक्ष, सामाजिक संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींची, कार्यकर्ते व पदाधिकाºयांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

Web Title: The 'answer two' movement by 'Anyan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.