अकोला- वाशिम महामार्गावर बस झाडावर आदळली; ३९ प्रवाशी जखमी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 05:18 PM2018-04-09T17:18:50+5:302018-04-09T17:18:50+5:30

मेडशी (वाशिम) - तांत्रिक बिघाडामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामंडळाची एम.एच. १४, बी.टी. २३७६ क्रमाकांची बस झाडावर आदळल्याची घटना अकोला ते वाशिम महामार्गावरील मेडशी गावानजीक ९ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.

On Akola-Washim highway, the bus fell on the tree; 39 passengers injured! | अकोला- वाशिम महामार्गावर बस झाडावर आदळली; ३९ प्रवाशी जखमी !

अकोला- वाशिम महामार्गावर बस झाडावर आदळली; ३९ प्रवाशी जखमी !

googlenewsNext
ठळक मुद्दे एम.एच. १४, बी.टी. २३७६ क्रमाकांची अकोला ते पुसद ही बस अकोलाकडे जात होती. एशियन पाईप फॅक्टरीजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि सदर बस रस्त्यालगतच्या एका झाडावर जाऊन आदळली. या अपघातात एकूण ३९ प्रवासी जखमी झाले. चालक सरदार हे गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.

मेडशी (वाशिम) - तांत्रिक बिघाडामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामंडळाची एम.एच. १४, बी.टी. २३७६ क्रमाकांची बस झाडावर आदळल्याची घटना अकोला ते वाशिम महामार्गावरील मेडशी गावानजीक ९ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात ३९ प्रवासी जखमी असून, जखमींना प्रथमोपचारानंतर अकोला येथे हलविण्यात आले.

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास एम.एच. १४, बी.टी. २३७६ क्रमाकांची अकोला ते पुसद ही बस अकोलाकडे जात होती. मेडशी ते पातूर या दरम्यान एशियन पाईप फॅक्टरीजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि सदर बस रस्त्यालगतच्या एका झाडावर जाऊन आदळली. या अपघातात एकूण ३९ प्रवासी जखमी झाले. चालक सरदार हे गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. जखमींवर मेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. शेंडे व चमूने उपचार केले. त्यानंतर काही जखमींना मालेगाव ग्रामीण रुग्णालयात तर काही जखमींना अकोला येथील रूग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले. या अपघातातत संजय रामकृष्ण खुरेकर (४२) डोंगरकिन्ही, कणवती रामकृष्ण खुरेकर (६५),  शांताबाई श्रीराम कंकाळ (६५) मरसुळ, डिगांबर विठोजी जामकर (५१) वाडेगाव, शिवाजी विठोबा नागरे (६७) वाडेगाव, रामेश्वर बाबाराव दराडे (२१) चिंचोली, जिवाजी कोंडजी इढोले (३२) अडोळी, तयबाबी मेराजखान (६०) अकोला, भाऊराव साजन धनगर (६१) रेगाव, सुरेश तुळशिराम बियाणी वाशिम, मोनिका पाकळे (२१) पुसद, शिवाजी लक्ष्मण पांढरे (२३) डोणगाव, सिमरण संजय जैन (१४) खामगाव, पुनम संजय जैन (३३) खामगाव, कृष्णा लांडगे (१७) डोणगाव, गौरव भास्कर ढोकणे (२६) पुसद, ज्ञानेश्वर लक्ष्मण मंडाणे (२७) पुसद, साधु नारायण केंद्रे (४०)  अकोला, गजानन महादेवराव कुटे (२८) गिव्हा कुटे, दिनकर नारायण नांदे (५५) एकांबा, महादेव बाळोजी (२४), रामचंद्र परशराम तिरकर (६०) उंबर्डाबाजार, सुभाष गोविंदा महल्ले (४४) काटेपुर्णा, हसन अमिर शहा कें द्रा, अमिर उस्मान शाह (६५) केंद्रा, संजय रामदासलाल  शर्मा (४८) वाशिम, कल्पना घाटी मालेगाव, वसंता  खंडुजी (६५) खोलापुर,  शे.सलमान बहादूर (२५) लातूर, महादेव परशराम इंगळे (३६) जऊळकारेल्वे,  वच्छला मस्के (६५) ढिल्ली, गजानन  बाजीराव मोरे (२२) करंजी, माया दौलतराव धंदरे (१७) उमरवाडी, अनिता कोंडुजी इढोळे (४५) अडोळी, श्रीकांत  देशमुख (३३) अकोला, शे.लालमिया (६५) केनवड, रावसाहेब दगडुजी घायाड (६०) अकोला, सुनिता लाडु चव्हाण (२०) खेर्डी, सुर्यकांत  गोमाजी पडघान (५५) भौरद अशी जखमींची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले तसेच वाशिम आगारातील अधिकाºयांनी भेट दिली. पुढील तपास पोलीस जमादार जायभाये करीत आहेत.

Web Title: On Akola-Washim highway, the bus fell on the tree; 39 passengers injured!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.