५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम : ३१ मार्चपर्यंत खोदावे लागणार खड्डे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 02:24 PM2018-02-13T14:24:59+5:302018-02-13T14:28:57+5:30

वाशिम : ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गंत सन २०१८ व २०१९ मधील उद्दिष्टपूर्तीच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग आतापासूनच कामाला लागला असून, ३१ मार्च २०१८ पर्यंत खड्डे तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

50 Crore Tree Planting Program: trenches tu be dug by March 31! | ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम : ३१ मार्चपर्यंत खोदावे लागणार खड्डे!

५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम : ३१ मार्चपर्यंत खोदावे लागणार खड्डे!

googlenewsNext
ठळक मुद्देराज्य शासनातर्फे व्यापक प्रमाणात वृक्षलागवड मोहिम हाती घेण्यात आलेली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वृक्ष लागवडीची जबाबदारी असून सन २०१८ मधील नियोजनाला सुरूवातही झाली आहे.२८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत वृक्षलागवडीसाठी ‘लॅन्ड बँक’ अंतिम करावी लागणार आहे.

वाशिम : ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गंत सन २०१८ व २०१९ मधील उद्दिष्टपूर्तीच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग आतापासूनच कामाला लागला असून, ३१ मार्च २०१८ पर्यंत खड्डे तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनातर्फे व्यापक प्रमाणात वृक्षलागवड मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. या मोहिमेंतर्गत प्रत्येक विभागाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वृक्ष लागवडीची जबाबदारी असून सन २०१८ मधील नियोजनाला सुरूवातही झाली आहे. पश्चिम वºहाडातील अकोला, वाशिम, बुलडाणा आदी जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रशासकीय इमारती, विश्रामगृहे, विविध प्रवर्गातील रस्त्यांच्या बाजूला वृक्षलागवडीसाठी उपलब्ध असलेल्या जमिनीवर वृक्षलागवड करावी लागणार आहे. ऐनवेळी कोणतीही धावपळ नको म्हणून २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत वृक्षलागवडीसाठी ‘लॅन्ड बँक’ अंतिम करावी लागणार आहे. ३१ मार्च २०१८ पूर्वी वृक्ष लागवडीसाठी खड्डे तयार करून ठेवण्याचे नियोजन आहे. लावण्यात आलेल्या झाडांचे जीवंत राहण्याचे प्रमाण विचारात घेऊन, दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा ३० टक्के जादा झाडे लावण्याचेही नियोजन आहे. वृक्ष लागवडीसाठी मे २०१८ पर्यंत वन विभागाकडे मागणी नोंदवून आवश्यक ते रोपे प्राप्त करून घ्यावी लागणार आहेत. त्या अनुषंगाने नियोजन केले जात आहे, अशी माहिती वाशिम येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के.आर. गाडेकर यांनी दिली.

Web Title: 50 Crore Tree Planting Program: trenches tu be dug by March 31!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम