जव्हारमध्ये प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई, बळीराजा संकटात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 12:04 AM2019-06-28T00:04:59+5:302019-06-28T00:05:52+5:30

जून महिना संपायला आला तरीही पावसाचा लपंडाव सुुरु असल्याने तालुक्यातील शेतकरी हताश

The water scarcity of the animals in the jawar, the victims' crisis | जव्हारमध्ये प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई, बळीराजा संकटात

जव्हारमध्ये प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई, बळीराजा संकटात

Next

जव्हार : जून महिना संपायला आला तरीही पावसाचा लपंडाव सुुरु असल्याने तालुक्यातील शेतकरी हताश झाले असून, मंगळवारी जव्हारमध्ये कडक उन्ह पडल्याने पाऊस कधी येईल यासाठी बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.

दोन दिवसापूर्वी पावसाचे ढगाळ वातावरण असल्यामुळे पावसाचे चिन्ह दिसत होते. त्यातच सोमवारचा पाऊस काही भागात पालघर, वाडा, मोखाडा, विक्र मगड या भागात पाऊस झाला. मात्र जव्हारला पाऊस झालाच नाही. गडगडात व ढगाळ वातावरणामुळे पाऊस येऊन सर्वांना दिलासा मिळणार, असे चित्र दिसत होते. मात्र मंगळवारी तर कडक उन्ह पडले होते. त्यामुळे पाऊस कधी सुरु होईल, याची सर्वच नागरिक आतुरतेने वाट पहात आहेत.

या आठवड्यात पाऊस येईल म्हणून शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना सुरुवात केली असून, जमेल तशी करवड करून ट्रॅक्टरने नांगरणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र मंगळवारी कडक उन्ह पडल्याने सर्वच नागरिक, शेतकरी चिंतेत आले असून, नागली, भात, वरई ही केलेली पेरणी करपून वाया जाते की काय? दुबार पेरणीचे संकट ओढावणार नाही अशीही शेतकऱ्यांना चिंता वाटायला लागली आहे. या बाबत हवामान खात्याकडून होणाºया पावसाच्या घोषणा सध्या गमतीचा विषय बनला असून शेती व शेतकºयांसाठी हा काळ परीक्षेचा ठरणार आहे.

टंचाईचे चटके तीव्र तालुक्यातील महिला पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. दुचाकी, जीप, ट्रॅक्स आदी वाहनातुन ते पाणी आणत आहेत. त्यातच या ग्रामीण भागातील गाय, बैल, शेळी, म्हैस, या प्राण्यांना पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे.

Web Title: The water scarcity of the animals in the jawar, the victims' crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.