विरार कॉरिडोर सर्व्हेला स्थगिती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:30 PM2019-01-14T23:30:36+5:302019-01-14T23:30:57+5:30

गैरसमज असेल तर आताच दूर करा : प्रांताधिकाऱ्यांच्या सूचना

Virar Corridor Survey does not have a stay order | विरार कॉरिडोर सर्व्हेला स्थगिती नाही

विरार कॉरिडोर सर्व्हेला स्थगिती नाही

googlenewsNext

वसई : विरार-पनवेलरेल्वे कॉरिडॉरच्या विरोधात आता नवघर पूर्वेकडील रहिवासी एकवटले असून, चुकीच्या पद्धतीने परियोजनेच्या सर्वेक्षणाला विरोध केला जात आहे. त्यामुळे सर्व्हे करतांना नागरिकांची बाजू ऐकून घ्या व त्यांचा काही गैरसमज असेल तर आत्ताच दूर करा अशा सूचना दिल्या आहेत. तसेच, सर्वेक्षणाला कोणतीही स्थगिती नसल्याचे प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर यांनी स्पष्ट केले आहे.

रविवारी वसईतील सदिच्छा सेवा मंडळ सभागृहात गृहसंकुलाचे अध्यक्ष, सचिव, सभासद व स्वतंत्र घरात राहणाºया रहिवाशांची बैठक झाली. याठिकाणी अनेकांनी कर्ज घेऊन सदनिका, गाळे घेतले आहेत. रेल्वेच्या प्रकल्पासाठी ते हटविले जाणार असल्याने रहिवाशांची, कारखानदारांची झोप उडाली आहे. त्याचा मिळणारा मोबदला अत्यल्प असल्याने नव्या ठिकाणी घर घेणे परवडणार नाही.

गेली अनेक वर्ष नवघर पूर्वेला वस्ती उभी आहे. विरार, नालासोपारा वसई मार्गावरून प्रकल्प जाणार असल्याने रेल्वेने जास्त जागा वसईतून का मागितली आहे. नागरी वस्तीचा विचार करून कॉरिडॉरचा मार्ग मिठागरातून न्यावा अशा सूचना यावेळी नागरिकांनी केल्या. जोपर्यंत रहिवाशांना न्याय मिळत नाही तोवर शिवसेना लढा देणार असल्याचे राजाराम बाबर यांनी सांगितले.

नवघर पूर्वेला १२५ गृहसंकुले, बैठी घरे तसेच १०८ इमारतीत औद्योगिक कारखाने व झोपडपट्टी अशी संमिश्र वस्ती आहे. याबाबत रेल्वेच्या अधिकाºयांना भेटणार असून प्रकल्पाला ठाम विरोध करणार आहोत. जोवर नागरिकांच्या हिताचा निर्णय घेतला जात नाही. तोवर गप्प बसणार नाही असे ते म्हणाले.

या आहेत रहिवाशांच्या गंभीर अडचणी
आता आमची राहती घरे उध्वस्त होणार आहेत. आम्ही संघर्ष करायला तयार आहोत. गृहसंकुलात राहत असलो तरी बºयाच इमारती या मालकांच्या नावावर असल्याने जरी रेल्वेने मोबदला दिला तरी तो जमीन मालकाला मिळेल मग आमचे काय? आम्ही आमचे कुटुंब घेऊन कुठे जायचे. या तांत्रिक अडचणी सुटल्या पाहिजेत. असे नवघर पूर्व येथील रहिवासी सांगत आहेत. नागरी वस्तीतून प्रकल्प उभारण्यापेक्षा रेल्वेने पर्यायी जागा निवडावी. आमच्या वस्तीला वाचवा अनेक इमारतींच्या कन्व्हेयंस सातबाºयावर मालकाचे नाव आहे. महागाईच्या काळात दुसरीकडे घर घेणे शक्य होणार नाही. रेल्वेने सर्वबाजूने विचार करावा.

विरार - पनवेल कॉरिडॉरसाठी सर्व्हे सुरु झाला आहे. नवघर पासून ज्या ठिकाणाहून रेल्वेचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. त्याठिकाणी हे काम सुरु आहे. या प्रक्रियेला स्थगिती देण्ंंंयात आलेली नाही. काही अडचणी, गैरसमज आहेत का हे तपासले जाणार आहे.
- दीपक क्षीरसागर, प्रांताधिकारी, वसई

Web Title: Virar Corridor Survey does not have a stay order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.