मंदिरातील त्रिशूल चोरणाऱ्यास अटक

By admin | Published: November 17, 2016 05:25 AM2016-11-17T05:25:01+5:302016-11-17T05:25:01+5:30

चिखले गावातील वडकती येथल्या अंबे माता मंदिरातील चांदीचे त्रिशूळ चोरणाऱ्या विष्णुदेव सिंह या चोरट्याला गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे घोलवड पोलिसांनी अटक केली आहे.

Trespass hunters arrested in the temple | मंदिरातील त्रिशूल चोरणाऱ्यास अटक

मंदिरातील त्रिशूल चोरणाऱ्यास अटक

Next

डहाणू/बोर्डी : चिखले गावातील वडकती येथल्या अंबे माता मंदिरातील चांदीचे त्रिशूळ चोरणाऱ्या विष्णुदेव सिंह या चोरट्याला गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे घोलवड पोलिसांनी अटक केली आहे. रविवार, १३ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास अंबे माता मंदिरात दर्शनाच्या बहाण्याने मंदिरात घुसून आरोपीने चोरी केली होती. देवीची पूजा करतांना पुजाऱ्याला चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तात्काळ मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. मात्र अनोळखी व्यक्तीने चोरी केल्याचे स्पष्ट झाले. चोरट्याने मंदिरानिजक दुचाकी ठेवली होती परंतु, फुटेजमध्ये दुचाकी नव्हती. आरोपी हा अनोळखी वाटल्याने चंद्रकांत लक्ष्मण माच्छी या मंदिरानजीक राहणाऱ्या ग्रामस्थाने सदर दुचाकीचा जीजे-१५, बीजे-११९३ हा क्र मांक लक्षात ठेवला होता. त्या अनुषंगाने मंदिर परिसरातील भक्तांनी शोध मोहीम सुरु केली. अखेर महाराष्ट्र गुजरात सीमेवरील उंबरगाव तालुक्यातील गांधीवाडी येथल्या चाळीत राहणाऱ्या विष्णुदेव सिंग या चोरट्यापर्यंत भक्त पोहचले. त्याची धरपकड करून घोलवड पोलिसांच्या हवाली करण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Trespass hunters arrested in the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.