बोलीभाषांच्या संवर्धंनाकरिता देशभ्रमण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 02:18 AM2018-11-05T02:18:54+5:302018-11-05T02:19:09+5:30

ज्या भाषेत बोलता, त्याच भाषेत लिहते होऊन बोलीभाषेच्या विकासाला हातभार लावा असे आवाहन डोंबिवलीतील पंचविशीच्या तरुणाने देशातील विद्यार्थ्यांना केले आहे.

Travel for the Promotion of Languages | बोलीभाषांच्या संवर्धंनाकरिता देशभ्रमण

बोलीभाषांच्या संवर्धंनाकरिता देशभ्रमण

Next

- अनिरुद्ध पाटील
बोर्डी - ज्या भाषेत बोलता, त्याच भाषेत लिहते होऊन बोलीभाषेच्या विकासाला हातभार लावा असे आवाहन डोंबिवलीतील पंचविशीच्या तरुणाने देशातील विद्यार्थ्यांना केले आहे. या करिता लडाख ते कन्याकुमारी अशा सायकल देशभ्रमंतीला तो निघाला असून खेडोपाड्यात हिंडून याबाबत जनजागृती करीत आहे. दरम्यान गुजरात मार्गे तो बोर्डी येथे दाखल झाला, त्याचे स्थानिकांनी पुष्प देऊन स्वागत केले.
मुंबईच्या डोंबिवली येथील गंधार कुलकर्णी हा पंचविशितील तरु ण त्या-त्या प्रदेशातील बोलीभाषेचे संवर्धन व्हावे या ध्येयाने झपाटला आहे. त्याने संस्कृतचे एम.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून डोंबिवलीतील ज्ञान प्रबोधिनीत विस्तार केंद्रात सात वर्षांपासून काम करीत आहे. मागील एका वर्षापासून या अभियानाशी तो जोडला गेला आहे. लडाख ते कन्याकुमारी असा २० हजार किमीचा प्रवास सायकलने तो करीत आहे. त्यामुळे खेडोपाड्यात पोहचता येऊन त्या भागातील शाळांना भेट देता येते. त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बोली भाषेत संवाद साधण्यासह, ती लिहिण्यासाठी उद्युक्त करणे हा त्या मागचा हेतू आहे. पुस्तकाच्या बाहेर जाऊन भाषेचा अभ्यास करीत आहे. विद्यापीठातील प्रबंध धूळखात पडले असून या माध्यमातून ते कृतीशील करता येतील अशी त्याची धारणा आहे. या करिता १ जुलै ते १५ आॅगस्ट २०१९ पर्यंतचे ५०० दिवसांचे लक्ष ठेवण्यात आले असून शेवटचा टप्पा कन्याकुमारी आहे. तेथेच या अभियानाची सांगता होणार आहे.
रविवार, ३ नोव्हेंबर रोजी तो महाराष्ट्र गुजरात सीमा भागात आला. झाई येथे त्याचे स्थानिकांनी स्वागत केले. त्याने ७३०० किमीचा प्रवास पूर्ण केला आहे.

विद्यार्थ्यांना बोलीभाषा संवर्धनारिता प्रोत्साहन करणे हा या अभियांनाचा उद्देश आहे. आतापर्यंत प्रत्येक भागातील आलेले अनुभव भिन्न आहेत. उच्चारण शास्त्र आणि लिखाण या विषयावर तो विद्यार्थ्यांशी बोलतो. बोलीभाषेत डायरी लिहल्यास त्याचे साहित्य निर्माण होऊन भाषाविकास होतो. साधारणत: पंचवीस वाक्य बनवली असून त्या-त्या बोलीभाषेत लिहायला सांगितले जाते. या भाषा संगणकातही वापरल्या गेल्यास भाषा विकासाला चालना मिळेल.’’
-गंधार कुलकर्णी, बोलीभाषेच्या विकासकारिता भारतभ्रमंतीला निघलेला युवक

Web Title: Travel for the Promotion of Languages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.