सेना-भाजपातील श्रेयवाद शमला, प्रशासनावर फोडले खापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:23 AM2017-10-04T01:23:47+5:302017-10-04T01:24:24+5:30

मीरा रोडच्या शांतीनगरमध्ये जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु झालेले असताना त्याचे श्रेय घेण्या वरुन शिवसेना आणि भाजपा नगरसेवकांमध्ये पेटलेला वाद अखेर मंगळवारी शमला.

Shravalkatta Shamla in the Army-BJP, Shamla on the administration | सेना-भाजपातील श्रेयवाद शमला, प्रशासनावर फोडले खापर

सेना-भाजपातील श्रेयवाद शमला, प्रशासनावर फोडले खापर

Next

मीरा रोड : मीरा रोडच्या शांतीनगरमध्ये जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु झालेले असताना त्याचे श्रेय घेण्या वरुन शिवसेना आणि भाजपा नगरसेवकांमध्ये पेटलेला वाद अखेर मंगळवारी शमला. शिवसेनेने धरणे धरत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अखेर पालिकेने पुन्हा कामाला सुरवात केली. त्यानंतर शिवसेनेच्या नगरसेविकेने प्रशासनावर नाराजी व्यक्त करत सोमवारपासून सुरु केलेले धरणे आंदोलन मागे घेतले. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शांतीनगर सेक्टर दोनच्या जलकुंभातुन परिसरातील सेक्टर १, २, शांती विहार, पुनम सागर कॉम्प्लेक्स आदी भागासाठी ४०० मिमी व्यासाची मोठी जलवाहिनी टाकण्याचे काम गेल्या आठवड्यात सुरु झाले आहे. पण सोमवारी दुपारी कामाचे श्रेय घेणे आणि नारळ फोडण्यावरुन प्रभागातील स्थानिक शिवसेना नगरसेविका दिप्ती भट आणि भाजपाचे स्थानिक नगरसेवक दिनेश जैन, अश्विन कासोदरीया व हेतल परमार यांच्यात बिनसले. त्यातून भाजपा नगरसेवकांनी ठेकेदाराला काम बंद करायला लावत मंळवारी सकाळी महापौरांच्या हस्ते भुमिपूजन करुन काम सुरु करण्याचा पावित्रा घेतला.
काम बंद झाल्याने शिवसेना नगरसेविका भट यांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार करत जलवाहिनी टाकण्याचे पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. पण पालिका अधिकारी आणि ठेकेदाराकडून काम सुरु केले न गेल्याने भट यांनी कामाच्याच ठिकाणी सोमवारपासून धरणे धरले. रात्रभर आणि मंगळवारी दुपारपर्यंत त्या धरणे धरुन होत्या. खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक आदींनी काम बंद केल्याबद्दल प्रशासनाकडे नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला. तर माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम, गटनेते हरिश्चंद्र आमगावकर, माजी उपमहापपौर प्रवीण पाटील, माजी गटनेत्या नीलम ढवण, माजी विरोधी पक्षनेत लक्ष्मण जंगम, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, शंकर वीरकर, शहरप्रमुख प्रशांत पालांडे, धनेश पाटील आदींनी भट यांच्या धरणे आंदोलनात सहभाग घेतला.
अखेर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे हे मंगळवारी दुपारी भाजपा नगरसेवक दिनेश जैन व हेतल परमार यांना घेऊन आंदोलनाच्या ठिकाणी आले. नगरसेवकांना कामाची माहिती दिली नसल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. तसेच चौघे नगरसेवक एकत्र मिळून नारळ फोडू, अशी सूचना त्यांनी केली. त्यावरुन पुन्हा वादविवाद सुरु झाला. पुन्हा नारळ फोडायची गरज नाही, काम सुरु करा, असा पावित्रा भट आदींनी घेतला. शेवटी जैन व परमार या नगरसेवकांनीही नारळ फोडण्याचा मुद्दा बाजुला ठेवला. अखेर जलवाहिनी टाकण्याच्या कामास पुन्हा सुरवात करण्यात आली आणि भट यांचे धरणे आंदोलन संपुष्टात आले.

आधी दोन नगरसेवकांचा प्रभाग होता, तेव्हाही वेगवेगळ््या पक्षाच्या नगरसेवकांचे एकमेकांशी पटत नव्हते. आता चार नगरसेवकांचा प्रभाग असल्याने वाद जास्तच वाढणार असल्याची ही सुरूवात मानली जाते. नगरसेवकांकडून सामंजस्य दाखवले जाणे आवश्यक असून मुळात प्रशासनाच्या बोटचेप्या भूमिकेमुळे वाद विकोपाला जातील, अशी भीती निर्माण झाली आहे.

Web Title: Shravalkatta Shamla in the Army-BJP, Shamla on the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.