भाजपाच्या खासदाराला शिवसेनेची उमेदवारी; पालघरमधून गावितांचे नाव निश्चित 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 02:44 AM2019-03-26T02:44:24+5:302019-03-26T02:45:11+5:30

युती करताना भाजपाशी भांडून मिळवलेल्या पालघर मतदारसंघात जोरदार लढत देऊ शकेल, अशा ताकदीचा उमेदवार मिळत नसल्याने शिवसेनेने भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्याचे नक्की केल्याचे समजल्याने शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे.

Shiv Sena's candidature for BJP MP; The names of the singers from Palghar are certain | भाजपाच्या खासदाराला शिवसेनेची उमेदवारी; पालघरमधून गावितांचे नाव निश्चित 

भाजपाच्या खासदाराला शिवसेनेची उमेदवारी; पालघरमधून गावितांचे नाव निश्चित 

Next

पालघर : युती करताना भाजपाशी भांडून मिळवलेल्या पालघर मतदारसंघात जोरदार लढत देऊ शकेल, अशा ताकदीचा उमेदवार मिळत नसल्याने शिवसेनेने भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्याचे नक्की केल्याचे समजल्याने शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. उमेदवारच नव्हता, तर मतदारसंघ मागितला कशाला, असा प्रश्न शिवसैनिक उघडपणे विचारू लागले आहेत.
यात सर्वाधिक कोंडी झाली आहे, ती गावित यांची. पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. हा मतदारसंघ शिवसेनेला दिल्याने खासदारकीऐवजी आमदार होण्याचे त्यांचे प्रयत्न होते. पूर्वी राज्यमंत्रीपद मिळाल्याने त्यांना पुन्हा मंत्रीपदाची अपेक्षा होती. शिवसेनेकडे असलेला पालघर विधानसभा मतदारसंघ लोकसभेच्या बदल्यात मागितल्याचे सांगितलेही जात होते. त्यात ते बहुजन विकास आघाडीत जाणार असल्याच्या वावड्या उठल्या. आता शिवसेनेतर्फे लोकसभा लढवावी लागणार असल्याने मंत्रीपदाऐवजी शिवबंधन बांधण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. भाजपाचा खासदार शिवसेनेतर्फे लढल्यास आणि त्याला श्रमजिवी संघटनेची साथ मिळाल्यास त्याचा फायदा होईल, असे त्रैराशिक यासाठी मांडले जात आहे. या पार्श्वभूमीवर गावित यांनी अजून काही ठरलेले नाही, एवढीच प्रतिक्रिया दिली.
शिवसेनेचा उमेदवार ठरत नसल्याने बहुजन विकास आघाडीनेही आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यांच्या पक्षातर्फे बळीराम जाधव यांचेच नाव चर्चेत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, माकपाचा पाठिंबा आणि वसई, विरार, नालासोपाऱ्यावरील पकडीचा फायदा उठवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मतदारसंघ हातून गेल्याबद्दल भाजपा आणि संघ परिवारात असलेल्या नाराजीचा फायदा उठवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

उमेदवारीची घोषणा आज होण्याची शक्यता
पालघर नगरपरिषदेची निवडणूक पार पडेपर्यंत रोखून धरलेली राजेंद्र गावित यांच्या उमेदवारीची घोषणा मंगळवारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा पोटनिवडणुकीपूर्वी पक्षात घेतलेला चिंतामण वनगा यांचा मुलगा श्रीनिवास यांना शिवसेनेने आमदारकीच्या पुनर्वसनाचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Shiv Sena's candidature for BJP MP; The names of the singers from Palghar are certain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.