यंत्रमाग उद्योगास लागली घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 02:22 AM2019-04-12T02:22:48+5:302019-04-12T02:22:53+5:30

जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयाचा लोकमतने घेतलेला आढावा

The powerhouse was in the house | यंत्रमाग उद्योगास लागली घरघर

यंत्रमाग उद्योगास लागली घरघर

Next

भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदार संघात असलेल्या भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम व भिवंडी ग्रामिण या भागात यंत्रमाग व कापड व्यवसायातील मंदी हा प्रमुख मुद्दा आहे. भाजप सरकारने यासाठी केवळ घोषणा केल्या असून कोणतीही योजना अंमलात आणली नाही. त्यामुळे या भागातील व्यापारी वर्ग भाजपावर नाराज असून त्याचा परिणाम मतदानावर होणार आहे.


शहर व परिसरात ८ लाखापेक्षा जास्त यंत्रमाग असून त्यावर सुमारे ५ लाखापेक्षा जास्त यंत्रमाग कामगार काम करीत आहेत. कापडमार्केटमध्ये कापडास उठाव नसल्याने त्याचा परिणाम या व्यवसायावर झाला आहे. अनेक व्यापाऱ्यांकडे विणलेले कच्चे कापड व मार्केटमध्ये विक्रीचे कापड साठलेले आहे. उत्पादन जास्त झाल्याने या भागातील काही यंत्रमाग कारखाने कधी कधी बंद केले जातात. त्याचा फटका कामगारांना बसतो. आर्थिक उलाढाल कमी झाल्याने परिसरांतील उद्योग व्यवसायावरही त्याचा परिणाम झाला. त्यावर कोणतीही उपाययोजना सरकारने केलेली नाही. या भागात असलेल्या कारखान्यात छोटे यंत्रमागधारक एका छताखाली येऊन आपला व्यवसाय करीत आहेत. त्यांच्याकडे शासनाने लक्ष दिले नाही. ही वस्तूस्थिती व्यापाऱ्यांनी व यंत्रमागधारकांनी सरकारकडे मांडली. त्यानंतर वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी विविध योजना जाहिर केल्या. आॅनलाईन यंत्रमागाच्या योजनांचा कार्यक्रम झाल्यानंतर यंत्रमागधारकांच्या आशा उंचावल्या. परंतू या योजनांचा यंत्रमागधारकांना लाभ मिळाला नाही. विजेची समस्याही गंभीर असून, रहिवासी व कारखानदारांच्या तक्रारीकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने त्याचा परिणाम निवडणुकीत होणार आहे.


सरकारने ‘पॉवर-टेक्स’च्या नावाने विविध योजना जाहिर केल्या. मात्र त्याचा लाभ मिळालेला नाही. यापुर्वीच्या काँग्रेस सरकारने यंत्रमाग उद्योगासाठी विविध सवलती दिल्या. राज्यातील यंत्रमागासाठी ४६४ कोटी रूपयांची सबसिडी देण्यासाठी बजेटमध्ये तरतुद केली होती. संजीवनी योजनेनुसार थकबाकी भरणाºया व्यापाºयांना ५५ टक्के सवलत दिली.
- रशीद ताहिर, माजी आमदार

कापड उद्योगावर येथील मार्केट व कामगारांचे कुटूं्ब अवलंबून आहेत. वारंवार येणाºया मंदीने कामगारांना काम कमी मिळते. काही कारखाने मालकांनी बंद ठेवल्याने कामगारांना गावी जाण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे येथील कामगारवर्ग कमी होऊ लागला आहे. भाजपने कामगारांविषयी कोणतेही धोरण निश्चित केले नाही.
- विजय खाने, कामगार नेता

आतापर्यंत काय झाले उपाय?
1या भागातील यंत्रमागधारकांवर ज्याज्यावेळी संकट आले, त्यात्यावेळी काँग्रेसने त्यांना सवलती जाहिर करून हा व्यवसाय जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला.
2या व्यवसायातील लाखो कामगारांचा काँग्रेसने विचार करून त्यांच्यासाठी कारखानदारांना सवलती दिल्या. त्यामुळे बेरोजगारांना येथे मोठ्या संख्येने रोजगार मिळाला.
3भिवंडीतील कापड व्यवसायावर या भागातील छोटे-मोठे व्यवसाय अवलंबून आहेत. कच्च्या कापडावर प्रक्रिया करणाºया डार्इंग व सायझिंग येथे असून काँग्रेसने वीजबिलात दिलेल्या सवलतीचा फायदा सर्वांना मिळाला.

तज्ज्ञांना काय अपेक्षित आहे?
1यार्नचे भाव स्थिर झाले, तर कापड विक्रीस उठाव येईल. त्यामुळे सर्व यंत्रमाग पूर्वीप्रमाणे सुरू राहतील आणि सर्वांना रोजगार मिळेल.
2वीज बिलात सवलत दिल्यास उत्पादन दर कमी होऊन त्याचा परिणाम मार्केटवर होईल आणि व्यापाºयांना फायदा होईल. परिणामी यंत्रमाग व्यवसाय वाढेल.
3जगातील कापड उद्योगाशी स्पर्धा करताना यंत्रमागाचे आधुनिकीकरण करणे अपेक्षित आहे. परंतू त्यामध्ये शासनाचाही सहभाग हवा. टेक्स्टाईल पार्क उभारल्यास तरूण पिढीचा रोजगाराचा प्रश्न निकाली निघेल.


रोजगारासाठी शहराबाहेर धाव
देशभरातून यंत्रमाग कामगार भिवंडीतील कारखान्यात काम करण्यास येतात; पण शासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिक बेरोजगार शहराबाहेर नोकरीसाठी जातात.

Web Title: The powerhouse was in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.