सोशल मीडियाच्या काळात पोस्टाचे ‘वैभव हरपले’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:42 PM2019-04-20T23:42:25+5:302019-04-20T23:42:35+5:30

अवस्था अतिशय बिकट, उतरती कळा

Posting of 'Vaibhav Harpale' during social media | सोशल मीडियाच्या काळात पोस्टाचे ‘वैभव हरपले’

सोशल मीडियाच्या काळात पोस्टाचे ‘वैभव हरपले’

Next

नालासोपारा : सरकारी योजना पोस्ट आॅफिसच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविल्या जात आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र पण वाढवण्यात आले आहे. काही योजना लोकांपर्यन्त पोहचवण्याची जवाबदारी पोस्टावर आहे. या योजना लोकांपर्यन्त पोहचतील का ? याबाबत काहीही विचार करण्यात आलेला नाही. काही पोस्ट आॅफिसची अवस्था आणि दुर्लक्ष यामुळे बिकट झाली आहे तर दुसरीकडे सरकार काहिना काही योजना काढून त्याचा भार वाढवत आहे. काही याच प्रकारची स्थिती वसईच्या वालीव विभागात असलेल्या पोस्ट आॅफिसची झालेली आहे. अत्यंत बिकट अवस्था आणि समस्येने ग्रासलेले हे पोस्ट आॅफिस आहे.

एखाद्या वीरान खंडहरा सारखी अवस्था या पोस्टाची झाली आहे. ५० वर्षे जुन्या ज्या इमारतीमध्ये हे पोस्ट चालवले जाते. तिची अवस्था अत्यंत धोकादायक असून ती कधीही कोसळू शकते. कर्मचारी जीव मुठीत धरूनच येथे कामे करतात. याविषयी त्यांनी अनेक वेळा तक्र ारी केल्या आहेत पण त्याकडे सातत्याने काणाडोळा केला जातो आहे.

या पोस्टामधे सुरक्षेचाही अभाव आहे. कागदपत्राची कोणतीही सुरक्षा याठिकाणी नाही. आलेले पत्र, पार्सल सामान यांचीही सुरक्षा नाही . पोस्ट आॅफिसचा मुख्य दरवाजा अतिशय कमजोर आणि खिडक्या असून नसल्यासारख्या आहेत. सरकारी योजनाचे कागदपत्र काही लोकांचे गहाळ्ही झाले असल्याचे कळते.

पोस्टमन आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. वसई पूर्वेकडील काही मोजक्याच कर्मचाऱ्यांच्या साहयाने पोस्ट आॅफिसचा कारभार सांभाळत आहेत. पोस्टमनचा अभाव असल्या कारणाने कागदपत्रे आणि आलेली पत्रे संबंधितांपर्यंत वेळेत पोहचत नसल्याचेही कळते. कार्यक्षेत्र या पोस्ट आॅफिसचे मोठे असले तरी एक दोन पोस्टमनच्या साहयाने बटवडा केला जातो.

या पोस्टात सर्वसामान्यांच्या ठेवी, मुदतठेवी, मासिक उत्पन्नयोजना , पोस्टल विमा योजना आदींची करोडो रुपयांचे मूल्य असलेली कागदपत्रे ठेवलेली आहेत. त्यांच्याही सुरक्षेकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे गैरप्रकार होण्याचीही शक्यता आहे.

नव्या तंत्रज्ञानाचे प्रखर आव्हान कसे पेलणार? हाच खरा प्रश्न
चार दशकांपूर्वी कुरिअर आणि आता काळाच्या पडद्याआड गेलेले रेडिओ पेजर, सुरू झाले तेव्हा पोस्ट खाताने आपले डोळे उघडळे नाही. नव्या तंत्रज्ञानाची कास धरली नाही त्यामुळे पैसे पाठविणे, पत्रे पाठविणे या मुख्य व्यवसायाला लागत असलेला सुरूंग पोस्टाने कधी गांभिर्याने घेतला नाही. इंटरनेट आल्यावर तर इमेलमुळे पोस्टाची मृत्यूघंटाच वाजली. उरली सुरली कसर आरटीजीएस तंत्राने भरून काढली. पैसे पाठविण्याचे एकमेव माध्यम होत मनिआॅर्डर आणि इंन्शुअर्ड पार्सल परंतु आरटीजीएसमुळे काही क्षणात पैसे कुठून कुठेही पाठविणे शक्य झाले. एकेकाळी दुरध्वनी सेवा पोस्टाची मक्तेदारी होती. त्यालाही मोबाईल फोनमुळे सुरूंग लागला. त्यातून पोस्टाचे वैभव लयाला जात राहिले.

इमेल, व्हॉट्स अ‍ॅप, मॅसेजिंग व तत्सम नव्या तंत्रामुळे , कुरिअर, पोस्टाचे महत्व दिवसेंदिवस कमी होते आहे. त्यात आहे त्या कार्यालयाकडे अक्षम्य दुर्लक्ष होते आहे.

Web Title: Posting of 'Vaibhav Harpale' during social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.