पालघर लोकसभेसाठी बविआची मोर्चेबांधणी; राष्ट्रवादी, सीपीएमशी संपर्क?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 10:56 PM2019-03-10T22:56:50+5:302019-03-10T22:58:46+5:30

देशभरात रविवारपासून निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे.

Palibhar Lok Sabha Bawiyachi front line; Nationalist, CPM contact? | पालघर लोकसभेसाठी बविआची मोर्चेबांधणी; राष्ट्रवादी, सीपीएमशी संपर्क?

पालघर लोकसभेसाठी बविआची मोर्चेबांधणी; राष्ट्रवादी, सीपीएमशी संपर्क?

Next

वसई : निवडणूकीचे वारे वाहू लागल्यानंतर रविवारी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा आमदार हितेंद्र ठाकुर यांनी पालघर लोकसभा निवडणूक आमचा पक्ष लढवणार, तसेच जे पक्ष मदत करतील त्यांच्या सोबत आपण असल्याचे लोकमतशी बोलताना सांगीतले.

देशभरात रविवारपासून निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. गतवर्षी खासदार अ‍ॅड. चिंतामण वनगा यांच्या अकस्मात मृत्यूमूळे पालघर लोकसभा पोटनिवडणूक घेतली गेली. ही जागा भाजपाची होती व ती भाजपानेच शेवटपर्यंत राखली, मात्र एकेकाळी मित्रपक्ष असलेला शिवसेना पक्ष या निवडणूकित दुखावला गेला होता. सर्व ताकतीनिशी शिवसेनेने पोटनिवडणूकीत उतरत अपेक्षेपेक्षा जास्त मत घेत भाजपाला धक्का दिला. त्याचप्रमाणे जिल्हात तीन आमदार व वसई विरार पालिकेवर सत्ता असलेल्या बहुजन विकास आघाडीनेही आपला उमेदवार उभा केला होता. या पक्षाचे काम केलेला उमेदवार २००९ ला खासदार झाला होता. त्यानंतर गेल्या दोन निवडणूकीत त्यांनी आपला उमेदवार उभा केला होता.
दरम्यान, बविआ आपल्या सोबत इतर पक्षांना सोबत घेऊन जाणार असल्याचे स्पष्ट संकेत आमदार हितेंद्र ठाकुर यांनी दिल्याने निवडणूक दुहेरी रंगणार असल्याचे स्पष्ट चिन्हे आहेत.

गेल्या पोटनिवडणूकीच्या काळात बविआचे अध्यक्ष तथा आमदार हितेंद्र ठाकुर यांनी, आम्हाला उमेदवार आयात- निर्यात करण्याची गरज नाही. बहुजन विकास आघाडी ही पोटनिवडणूक लढवणार आणि आमचाच खासदार निवडून येणार असा दावा केला होता. मात्र, शिवसेना व भाजपाच्या अटीतटीच्या लढाईत बविआ तीन नंबरवर फेकला गेला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना वनगांच्या भावनीक विषय घेऊन पुढे आली. बविआचे पालघर जिल्ह्यात अस्तित्व मोठे आहे. आताही भाजप- सेना युतीनंतर पालघरसाठी शिवसेना आपला उमेदवार लढवत असली तरी बविआ देखील पुर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरणार आहे.

पालघर लोकसभा निवडणूक बविआ लढवणार.इतर पक्षांच्या सहकार्याने आमचा उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरणार.उमेदवार कोण असेल ते आम्ही नंतर जाहिर करू .
- आमदार हितेंद्र ठाकुर,
अध्यक्ष, बहूजन विकास आघाडी

Web Title: Palibhar Lok Sabha Bawiyachi front line; Nationalist, CPM contact?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.