दुष्काळी मराठवाड्यातील शेतकरी रोजगारासाठी पालघर जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 06:12 AM2018-11-16T06:12:59+5:302018-11-16T06:13:14+5:30

दुष्काळ : सगळी पिके गेली करपून, पोटासाठी बळीराजा देशोधडीला

In the Palghar district for the drought-hit Marathwada farmers' employment | दुष्काळी मराठवाड्यातील शेतकरी रोजगारासाठी पालघर जिल्ह्यात

दुष्काळी मराठवाड्यातील शेतकरी रोजगारासाठी पालघर जिल्ह्यात

Next

वसई : परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात यंदा वर्षी पाऊस कमी झाल्याने अनेक शेतकरी पोटाची खळगी भरण्यासाठी पालघर जिल्हात रोजंदारीसाठी दाखल झाले आहे. परभणी मधील जवळा बाजार, हिंगोली मधील गणेशपूर, गोंडल, जाम्ब, वटकली, नांदेड मधील हदगाव तालुक्यातील म्हाताला, न्यूघा, चक्री, मुदखेड डोणगाव, पिंपळखुटा गोपाळवाडी, दरेगाव वाडी, या ठिकाणची ३५ ते ४० कुटुंबे वसई, विरार, नालासोपारा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी रोजगाराच्या शोधात आली आहेत. नालासोपाऱ्यात आचोळे तलाव, आचोळे गाव, संतोषभुवन, निळेगाव, अग्रवाल, आंबेडकर नगर या ठिकाणी खोली भाड्याने घेऊन राहत आहेत.

गावामध्ये काम नाही म्हणून मुंबईला आलोत, मला तीन मुलं आहेत. नाक्यावर सकाळी उभे राहून कामाच्या शोधात असतो, आठवड्यातून २ दिवस काम मिळते, महागाईमुळे मिळणाºया रोजगारात भागातही नाही, शेवटी एखाद्यावेळी आमच्याकडे धान्य आणायला आणि खोलीचे भाडे देण्यासही पैसे नसतात. शासनाने आमच्या रोजगारासाठी काही तरी करणे गरजेचे आहे अशा प्रतिक्रि या परभणीच्या जिंतूर तालुक्यातील तांड्यावरच्या जनाबाई मोरे यांनी सांगितले. नांदेड मधील पिंगळी गावचे सूर्यभान, उषा भोसले, हे आपल्या ५ महिन्याच्या बाळाला सोबत घेऊनच खोदकाम करतात. शेती नापीक झाली, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर पूर्णपणे करपून गेली, पेरणीसाठी टाकलेले पैसेही पाण्यात गेले, आणि शेवटी कर्जबाजारी झालो. अशी त्यांची व्यथा आहे.

तर भुकेपोटीच मेलो असतो
गावात राहिलो असतो तर आता जेवढे काही किडूक मिडूक रोजगारातून मिळते तेवढेही मिळाले नसते. म्हणून पोटासाठी गाव सोडून रोजगाराच्या शोधात आम्ही मुंबई गाठली आहे. इथेही नाक्यावर कामासाठी थाबवून रोजगार शोधत असता अशी व्यथा नांदेडचे अर्जुन गव्हाणे यांनी लोकमतकडे मांडली.
 

Web Title: In the Palghar district for the drought-hit Marathwada farmers' employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.