मुस्लिमांनी दिली स्मशानासाठी जागा

By admin | Published: February 24, 2017 06:51 AM2017-02-24T06:51:49+5:302017-02-24T06:51:49+5:30

तालुक्यातील चिंचघर पाडा येथील स्मशानभूमीसाठी मुस्तफा मेमन यांनी जागा

Muslims have a place for cemeteries | मुस्लिमांनी दिली स्मशानासाठी जागा

मुस्लिमांनी दिली स्मशानासाठी जागा

Next

वाडा : तालुक्यातील चिंचघर पाडा येथील स्मशानभूमीसाठी मुस्तफा मेमन यांनी जागा विकत घेऊन ती दान केली. सचिन पाटील यांना स्मशानभूमीची गरज सांगताच त्यांनी आपल्या मालकीची पाच गुंठे जागा देण्याचे मान्य केले. याचा मोबदला म्हणून मुस्तफा मेमन यांनी पाटील यांना ३ लाख ५०,००० रूपये देवून, ही जागा खरेदी केली व स्मशानभूमीसाठी दान दिली. या जागेवर बोअरींग करण्याचेही दायित्व त्यांनी स्वीकारले आहे. अनुदानातून मुख्यशेडचे बांधकाम झाले असून उपस्थितांसाठी बैठक व्यवस्था करण्यात येत आहे. हिन्दू - मुस्लिम बंधुभावाचे हे अनोखे नाते जोडण्याचे काम मेमन यांनी केल्याने सर्व समाजांसाठी हे आदर्श उदाहरण आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.(वार्ताहर)

Web Title: Muslims have a place for cemeteries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.