निधी उरल्यास प्रमुख जबाबदार

By admin | Published: March 22, 2017 01:14 AM2017-03-22T01:14:14+5:302017-03-22T01:14:14+5:30

सर्व विभागांना विकास कामासांठी हा निधी दिलेला असून तो परत जाणार नाही याची सर्व विभाग प्रमुखांनी दक्षता घ्यावयाची आहे

Major liability if funds are available | निधी उरल्यास प्रमुख जबाबदार

निधी उरल्यास प्रमुख जबाबदार

Next

नंडोरे : सर्व विभागांना विकास कामासांठी हा निधी दिलेला असून तो परत जाणार नाही याची सर्व विभाग प्रमुखांनी दक्षता घ्यावयाची आहे. निधी शिल्लक राहिल्यास संबंधित विभाग प्रमुखांना जबाबदार धरले जाईल अशी, तंबी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिली.
जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी उपयोजना व विशेष घटक योजना अंतर्गत उपलब्ध निधीच्या खर्चाचे नियोजन, तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता व झालेले खर्च यांचा विभाग निहाय आढावा घेतला. मंजुर निधी सर्व विभागांनी वेळेत खर्च करणे हे बंधनकारक आहे.
सर्व विभाग प्रमुखांनी काटेकेरपणे नियोजन करून त्याप्रमाणे कार्यवाही करून ३१ मार्च पर्यंत १०० टक्के खर्चाचे नियोजन जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन २०१६-१७ साठी मंजूर नियतव्यय विहीत मुदतीत खर्च करण्याचे नियोजन सर्व यंत्रणांनी करावे व त्याप्रमाणे तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत दिल्या.
मात्र हे आदेश त्यांनी मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात देण्याऐवजी या पूर्वी दिले असते तर निधी कागदोपत्री खर्च झाला नसत अशी खवचट प्रतिक्रीया जिल्ह्यात व्यक्त होते आहे. (वार्ताहर)

Web Title: Major liability if funds are available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.