बहुचर्चित सीबीएसई शाळेचे आज उद्घाटन

By admin | Published: April 17, 2017 05:59 AM2017-04-17T05:59:16+5:302017-04-17T05:59:16+5:30

विश्वासाहारतेचे बळ घेऊन जनसामान्यासाठी अविरत झटणारे सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे ह्यांच्या वाढिदवसा निमित्त सर्वसामान्यांसाठी ३२ खाटांचे रु ग्णालय

The inauguration of the CBSE school today | बहुचर्चित सीबीएसई शाळेचे आज उद्घाटन

बहुचर्चित सीबीएसई शाळेचे आज उद्घाटन

Next

पालघर : विश्वासाहारतेचे बळ घेऊन जनसामान्यासाठी अविरत झटणारे सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे ह्यांच्या वाढिदवसा निमित्त सर्वसामान्यांसाठी ३२ खाटांचे रु ग्णालय, सीबीएसई स्कुल चे उद्घाटन सोमवारी मान्यवरांच्या हस्ते होत असून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ.रागिणी पारेख ई. सह सामाजिक, राजकीय शैक्षणिक कार्यकर्ते, मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
एकीकडे अनेक लोक आपल्या वाढिदवसावर अवाढव्य खर्च करतांना दिसत असतांना दूसरी कडे आपल्या व्यवसायातील वाटा समाजपयोगी कार्यासाठी खर्च करणाऱ्या सांबरे ह्यांनी आपल्या वाढिदवसा निमित्त कबड्डी, शरीर सौष्ठव स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन केले आहे. ह्या स्पर्धा आयोजित करतांना राज्य स्तरावर आपल्या क्र ीडा नैपुण्याने मैदाने गाजविणाऱ्या खेळाडूंना आमंत्रित करून त्यांच्या अनुभवाचा फायदा ग्रामीण भागातील खेळाडूंना व्हावा हा या मागचा उद्देश्य आहे.
शुक्रवारी झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत पालघर जिल्ह्यातील अनेक उदयोन्मुख खेळाडूंनी भाग घेतला असताना जागतिक पातळीवर आपली मोहर उमटविणाऱ्या प्रसिद्ध बॉडी बिल्डर सुहास खामकर ह्यांना आमंत्रित केले होते. ह्यावेळी त्यांनी स्थानिक तरूणांशी वार्तालाप करीत स्पर्धेच्या तयारी संदर्भात बहुमूल्य टिप्स दिल्या होत्या. शनिवार पासून सुरु असलेल्या महिला-पुरु षांच्या राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धेचे आयोजन करताना पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, महाराष्ट्र पोलीस, रिझर्व्ह बँक, देना बँक ई. संघातील खेळाडू मधील गुणवत्तेचा फायदा इथल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना होणार आहे.
सांबरेंच्या वाढदिवस निमित्त कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा,खासदार चिंतामण वणगा,खा.कपिल पाटील, प्रसिद्ध मफतलाल ग्रुप चे उद्योगपती हृषीकेश मफतलाल, उद्योगपती तुषार राऊळ, जेष्ठ पत्रकार विनीत गोयंका, तुलसीदास भोईटे ई. मान्यवर उपथीत राहणार आहेत. उद्या भावनादेवी भगवान सांबरे सीबीएसई शाळा, भगवान महादेव सांबरे रूग्णालय, व्यसनमुक्ती केंद्र इ. चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते उद्या होणार आहे.

Web Title: The inauguration of the CBSE school today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.