कला व साहित्य संमेलनाचे उद्घाटन; क्षात्रैक्य परिषद व सोमवंशी समाजाचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 11:38 PM2019-03-23T23:38:20+5:302019-03-23T23:38:33+5:30

क्षात्रैक्य परिषद आणि सोमवंशी क्षत्रिय समाज संघ, (तारापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या भव्य कला व साहित्य संमेलनाचे  शनिवारी शानदार उद्घाटन होऊन संमेलन उत्साहात सुरू झाले असून सोमवंशी समाजाचा समाज बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले  आहेत.

Inauguration of Art and Literary Conferences; The initiative of the Kshatratya Council and the Somvanshi Samaj | कला व साहित्य संमेलनाचे उद्घाटन; क्षात्रैक्य परिषद व सोमवंशी समाजाचा पुढाकार

कला व साहित्य संमेलनाचे उद्घाटन; क्षात्रैक्य परिषद व सोमवंशी समाजाचा पुढाकार

googlenewsNext

बोईसर : क्षात्रैक्य परिषद आणि सोमवंशी क्षत्रिय समाज संघ, (तारापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या भव्य कला व साहित्य संमेलनाचे  शनिवारी शानदार उद्घाटन होऊन संमेलन उत्साहात सुरू झाले असून सोमवंशी समाजाचा समाज बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले  आहेत
तारापूर -घिवली रास्त्यावरील मोठे घर, येथे शनिवारी (दि.२३)  दुपारी ४ वाजता अभिनेता व लेखक, दिग्दर्शक सचित पाटील यांच्या हस्ते समेलनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी  क्षात्रैक्य परिषदेचे अध्यक्ष  विजय पाटील तारापुर सो. क्ष. स. संघाचे   अध्यक्ष विजय  सावे, ज्येष्ठ रंगकर्मी सुहास कामत, पत्रकार चित्राली चोगले, कोकण पर्यटन उद्योग संघाचे उपाध्यक्ष प्रभाकर सावे, क्षात्रैक्य परिषदेचे कार्यवाह विनय राऊत, सुकाणू समतिीचे निमंत्रक संजीव चुरी, जेष्ठ साहित्यिक  रघुनाथ सावे, सो. क्ष. स. संघाचे कार्य वाह निलेश सावे आदी मान्यवर उपस्थित होते कला व साहित्य संमेलनाच्या दूसर्या  दिवशी  रविवारी सकाळी ८ ते दुपारी २ पर्यत  साहित्य संमेलन, ग्रंथ दिंडी, स्मरणिका प्रकाशन, साहित्यिक चर्चा व परिसंवाद आणि कवी संमेलन इत्यादि अनेक कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले असून ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य  डॉ. सिसिलीया कर्व्हालो, ज्येष्ठ कवी साहित्यिक प्रा. अशोक बागवे व अरुण म्हात्रे इत्यादि मान्यवर  उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाचे वैशिष्ट्य व आकर्षण  म्हणजे कै. गणू बापू सावे कला दालनात भरविण्यात आलेले पुस्तक, निसर्ग व विविध ज्वलंत विषयांवरील फोटोग्राफी , व्यंगचित्र , जुन्या व इतिहासकालीन नाणी , तारापूर परिसरातील मुख्य व्यवसाय असलेल्या सोन्याच्या डिझाईन तयार करणारे साचे ( डाय) व सामाजिक संदेश देणाऱ्या सुबक रांगोळ्याचे प्रदर्शन भरविण्यात आले असून साहित्य प्रेमी चा त्याला  खुप प्रतिसाद लाभत आहे 

Web Title: Inauguration of Art and Literary Conferences; The initiative of the Kshatratya Council and the Somvanshi Samaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.