उद्योजकांनी केली वीज बिलांची होळी; महावितरणला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 11:22 PM2019-02-12T23:22:16+5:302019-02-12T23:22:45+5:30

सप्टेंबर २०१८ पासून केलेली वीज दरवाढ आणि पॉवर फॅक्टर पॅनल्टी व १ एप्रिल २०१९ पासून वाढविण्यात येणारी नियोजित वीज दरवाढ संपूर्ण पणे रद्द करण्यात यावी या व अन्य मागण्या करीता मंगळवारी तारापूरच्या कारखानदारांनी एमआयडीसीत वीज बिलांची होळी करून मागण्या मान्य न झाल्यास वीज बिले न भरण्याचा इशारा दिला आहे.

 Holi celebrates electricity bill; Gesture to mahavitaran | उद्योजकांनी केली वीज बिलांची होळी; महावितरणला इशारा

उद्योजकांनी केली वीज बिलांची होळी; महावितरणला इशारा

Next

बोईसर : सप्टेंबर २०१८ पासून केलेली वीज दरवाढ आणि पॉवर फॅक्टर पॅनल्टी व १ एप्रिल २०१९ पासून वाढविण्यात येणारी नियोजित वीज दरवाढ संपूर्ण पणे रद्द करण्यात यावी या व अन्य मागण्या करीता मंगळवारी तारापूरच्या कारखानदारांनी एमआयडीसीत वीज बिलांची होळी करून मागण्या मान्य न झाल्यास वीज बिले न भरण्याचा इशारा दिला आहे.
तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन (टीमा) चे अध्यक्ष डि. के. राऊत यांचे नेतृत्वाखाली आज सकाळी ११ वाजता टीमाच्या कार्यालयपासून एमआयडीसीतील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून वीज बिलांची होळी करून उपकार्यकारी अभियंता मदन राठोड यांना निवेदन दिले. यावेळी टीमाचे पदाधिकारी वेलची गोगरी, पापा ठाकूर, जगन्नाथ भंडारी, एस. आर. गुप्ता, रवी भावसार, शिरीष नाडकर्णी , पूनम कटारिया यांच्यासह उद्योजक व त्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते
आयोगाच्या नोव्हेंबर २०१६च्या आदेशानुसार आॅगस्ट २०१८ पर्यंत असलेले वीजदर पुढे मार्च २०२० पर्यंत कायम ठेवण्यात यावेत. सप्टेंबर २०१८ मधील दरवाढ व पॉवर फॅक्टर पेनल्टी पूर्णपणे रद्द करण्यात यावी. दर स्थिर ठेवण्यासाठी मागील सरकारने जानेवारी २०१४ पासून दरमहा ६०० कोटी रु. प्रमाणे दहा महिन्यासाठी ६०००/- कोटी रु. अनुदान दिले होते. त्याचप्रमाणे आताच्या सरकारने औद्योगिक वीजदर स्थिर ठेवण्यासाठी सप्टेंबर २०१८ ते २०२० या १९ महिन्यासाठी ३४००/- कोटी रु .अनुदान द्यावे. शेजारील सर्व राज्यांच्या समपातळीवर येईपर्यंत वीजदर स्थिर ठेवण्यात यावेत या मुख्य मागण्यासाठी आजचे आंदोलन करण्यात आले.
राज्यातील वीजदर शेजारील सर्व राज्यांपेक्षा जास्त असतानाही दिनांक १२ सप्टेंबर २०१८ च्या निकालाद्वारे पुन्हा दरवाढ लादली गेल्यामुळे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सुमारे १६५० उद्योग व यंत्रमाग या वीज ग्राहकांना सर्वांनाच दरवाढीच्या परिणामांना सामोरे जावे लागणार आहे . १ सप्टेंबर २०१८ पासून प्रत्यक्ष लागू झालेली दरवाढही कमी नाही तर एप्रिल २०१८ मध्ये साधारणत: २ टक्के वाढ लागू आहे. त्यामुळे सप्टेंबर २०१८ मधील वाढ अल्प म्हणजे 3 ते ४ टक्के आहे.

सव्वाशे कोटींचा महसूल
तारापूर एमआयडीसीमध्ये एस टीचे ४६० , एल टी चे ११८०, ई एचव्हीचे ७ असे मिळून एकूण १६४७ वीज ग्राहक असून एस. टी. चे वीज ग्राहक ७० ते ७५ , एल. टी चे १२ ते १३ तर , ई एच व्ही चे ६० असे मिळून सुमारे १५० मिलियम युनिट (एम.यु. ) (१० लाख युनिट म्हणजे १ एम. यु.) वीज वापरत असून महिना काठी फक्त तारापूर एमआयडीसी मधून सुमारे १२५ करोड रुपयांचा महसूल महावितरणला मिळत आहे

Web Title:  Holi celebrates electricity bill; Gesture to mahavitaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.