जोर'धार' पाऊस !भाईंदरच्या उत्तन समुद्रात ब्लेसिंग बुडाली, नाखवा व खलाशी बचावले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 09:15 AM2017-09-20T09:15:03+5:302017-09-20T09:15:14+5:30

वादळीवारा व मुसळधार पावसामुळे खवळलेल्या समुद्रात भाईंदरच्या उत्तन नवीखाडी येथील ब्लेसिंग ही मच्छीमार बोट बुडाली. बोटीवरील नाखवा व खलाशी, अशी एकूण 10 जणं पोहून नजीकच्या बोटींवर पोहोचल्याने बचावले.   

Heavy rain! Blazing drowning, nail and sailor in the northern sea of ​​Bhaindar | जोर'धार' पाऊस !भाईंदरच्या उत्तन समुद्रात ब्लेसिंग बुडाली, नाखवा व खलाशी बचावले

जोर'धार' पाऊस !भाईंदरच्या उत्तन समुद्रात ब्लेसिंग बुडाली, नाखवा व खलाशी बचावले

Next

धीरज परब / मीरारोड, दि. 20 - वादळीवारा व मुसळधार पावसामुळे खवळलेल्या समुद्रात भाईंदरच्या उत्तन नवीखाडी येथील ब्लेसिंग ही मच्छीमार बोट बुडाली. बोटीवरील नाखवा व खलाशी, अशी एकूण 10 जणं पोहून नजीकच्या बोटींवर पोहोचल्याने बचावले. उत्तनच्या नवीखाडी येथील डिक्सन डिमेकर यांची ब्लेसिंग ही मच्छिमार बोट सोमवारी (18 सप्टेंबर) मासेमारीसाठी समुद्रात गेली होती. डिक्सनसह भाऊ निलेश आणि 8 खलाशी बोटीवर होते. परंतु मंगळवारी ( 19 सप्टेंबर ) हवामान खात्या पाठोपाठ मत्स्य व्यवसाय विभागाने समुद्रात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देत मच्छिमारांना पुढील 24 तास समुद्रात जाऊ नये, असा इशारा दिला.  त्यामुळे समुद्रात मासेमारी साठी गेलेल्या बोटी माघारी परतू लागल्या. 

मंगळवारी डिमेकर यांची ब्लेसिंग बोटदेखील परतीच्या वाटेला लागली.  रात्री चौक धक्क्याला येत असताना किनाऱ्यापासून अर्धा किमी अंतरावर खवळलेल्या समुद्रात वाळूच्या बेटाला लागून उलटली. बोट बुडताच बोटीवरील नाखवा व खलाशांनी खवळलेल्या समुद्रात उड्या घेतल्या. नजिकच्या बॅबिलोन व मुक्तीदाता या वसईच्या मच्छिमार बोटींना गाठत स्वतःचा जीव वाचवला. बुधवारी (20 सप्टेंबर) सकाळी उत्तन, चौक, पाली भागातील मच्छिमारांनी चौक धक्क्याकडे धाव घेतली. बोटीवरील नाखवा व खलाशी सुखरूप असल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.  बुडालेल्या बोटीचा शोध मच्छिमारांनी लावला असून ती समुद्रात वाळूत उपडी होऊन  रुतून बसली आहे. सध्या मुसळधार पाऊस, वादळ आणि खवळलेल्या समुद्रा मुळे बोट काढण्याच्या मच्छिमारांच्या प्रयत्नांना यश आलेले नाही. 

हवामान खात्यासह मत्स्य व्यवसाय विभागाने मंगळवारीच वादळीवारा व मुसळधार पावसाची माहिती देत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा दिला. पण जे आधीच समुद्रात गेले होते त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची ? असा सवाल मच्छीमार नेते बर्नड डिमेलो यांनी केलाय. आधीच कल्पना असती तर मच्छिमार मासेमारीसाठी समुद्रात गेले नसते. डिमेकर यांच्या बोटीला अपघात होऊन असा जीवघेणा प्रसंग टळला असता. डिमेकरसह अन्य मासेमारी बोटींना परत फिरावे लागले. त्यामळे डिमेकर सह अन्य मच्छीमार यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी डिमेलो यांनी केली आहे.
 

Web Title: Heavy rain! Blazing drowning, nail and sailor in the northern sea of ​​Bhaindar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.